Sunday, September 6, 2026

Chandrashekhar Bawankule : राजस्थान महापालिका निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावात; 10 शहरांमध्ये भाजपच्या प्रचाराची सांभाळली धुरा

Chandrashekhar Bawankule : राजस्थान महापालिका निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावात; 10 शहरांमध्ये भाजपच्या प्रचाराची सांभाळली धुरा
राजस्थान : महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजस्थानमधील महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात आणि व्यवस्थापनात मोठी कामगिरी बजावली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांची राजस्थान महानगरपालिका निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या 15 दिवसांपासून ते राजस्थानमधील 10 महानगरपालिकांच्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत असून प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत. ( Chandrashekhar Bawankule)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयपूर, कोटा, भरतपूर, जोधपूर, उदयपूर, अजमेर, पाली, बिकानेर, भिलवाडा आणि अलवर या महानगरपालिका क्षेत्रांचे दौरे केले. या काळात त्यांनी कार्यकर्ते संमेलने, बैठका, पदयात्रा आणि गृहभेटींच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजपा आमदार आणि प्रमुख पदाधिकारीही या विजयी रणनीतीत सहभागी झाले आहेत. ( Rajasthan Municipal Election)
प्रचारादरम्यान त्यांनी राजस्थानमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रीयन नागरिकांशी, व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. निवडणुकीच्या रणनीतीसाठी ते राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि स्थानिक नेत्यांसोबत सतत समन्वय साधत आहेत. या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे भाजपाला निवडणुकीत मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >