Ganpati Special Trains 2026 : गणपतीसाठी गावी जाताय? मग रेल्वेची ही बातमी नक्की वाचा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ विशेष गाड्या

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने कोकणासाठी अतिरिक्त ३४ गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित (Unreserved) मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. यामुळे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे. (Ganpati Special Trains 2026)



लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ट्रेन (४ फेऱ्या)


गाडी क्रमांक ०१००३ (LTT ते मडगाव):


ही विशेष गाडी दिनांक १६ सप्टेंबर २०२६ आणि १९ सप्टेंबर २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ०७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)


गाडी क्रमांक ०१००४ (मडगाव ते LTT):


ही गाडी दिनांक १५ सप्टेंबर २०२६ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी मडगाव येथून सायंकाळी ४.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)


थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.(Ganpati Special Trains 2026)


prahaar.in/2026/09/06/sarnaiks-reprimand-puts-st-back-on-track-st-revenue-rises-by-66-crore-in-august/

पनवेल - चिपळूण - पनवेल मेमू अनारक्षित विशेष ट्रेन (३० फेऱ्या)


गाडी क्रमांक ०११५९ (पनवेल ते चिपळूण):


ही मेमू अनारक्षित विशेष ट्रेन दिनांक १० ते १४ सप्टेंबर २०२६ आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पनवेल येथून दुपारी १५.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. (एकूण १५ फेऱ्या)


गाडी क्रमांक ०११६० (चिपळूण ते पनवेल):


ही ट्रेन १० ते १४ सप्टेंबर २०२६ आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान चिपळूण येथून सकाळी ०९.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पनवेलला पोहोचेल. (एकूण १५ फेऱ्या)


ही मेमू सेवा दिनांक १५, १६ आणि १७ सप्टेंबर २०२६ या ३ दिवसांच्या कालावधीत चालवली जाणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.


थांबे: पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनि. (Ganpati Special Trains 2026)

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाने फेक मेसेज व्हायरल; कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी हे वाचा!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर एक मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Kalyan Latur Expressway : कल्याण ते लातूर आता अवघ्या ४ तासांत; ३५ हजार कोटींच्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेला मंजुरी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्याला थेट जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारने

Matheran Suicide News : माथेरानमध्ये दुर्दैवी घटना : अलेक्झांडर पॉईंटवरून २१ वर्षीय तरुणाची १५०० फूट खोल दरीत उडी मारली अन् थेट...

माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमधून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ

Jalgaon : स्मार्ट मीटरने वीज बंद झाली, तरी चोरीने वापर सुरूच ! जळगावात 28 जणांवर गुन्हे

Jalgaon : थकीत वीजबिलामुळे स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा आपोआप खंडित झाल्यानंतरही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वापर

Pune News : पुण्यात डीजेचा दणदणाट भोवला! नियम मोडल्याने पोलिसांची कारवाई; साऊंड सिस्टिम जप्त

पुणे :  पुण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Jalgaon : जळगावच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon : जळगावच्या पारोळा (Parola) तालुक्यातील कोळपिंप्री गावावर शुक्रवारी शोककळा पसरली. भारतीय सैन्य दलातील 1 पॅरा