- छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक संवर्धनाचा मार्ग मोकळा
मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबाच्या छळछावणीत छत्रपती संभाजी महाराजांच्या अजोड धैर्याचा, अभिमानाचा साक्षीदार असणारा धर्मवीर गड आता राज्य संरक्षित स्मारक बनणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यविभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे या गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाला निधी खर्चण्याचा आणि गडाच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Dharmaveer Fort)
- एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर अध्यक्ष विवेक भीमनवार यांची स्पष्टोक्ती; वस्तुस्थिती स्पष्ट करूनही वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत ...
ऎतिहासिक आणि स्थापत्य शास्त्रीय महत्व असलेला अहिल्यानगर जिल्ह्यातील पेडगाव येथील हा यादवकालीन किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्वाचे स्थान आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश हे मुघलांच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांना याच बहादुर गडावर आणले गेले. त्याकाळी मुघल बादशाह औरंगजेबाचे हे महत्वाचे लष्करी तळ होते. छत्रपती संभाजी महाराउ आणि कवी कलश यांच्यावरील तब्बल ४० दिवसांचे मुघली छळसत्र याच गडावर चालले. मुघली क्रुरतेला मराठी स्वाभिमान, धैर्य आणि बलिदानाने झाकोळल्यायाची साक्ष म्हणून या गडाकडे पाहिले जाते. त्यामुळे या गडाचे पुढे 'धर्मवीर गड' बनले. मात्र, हे ठिकाण राज्य संरक्षित स्मारक नसल्याने गडावरील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक तसेच स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमुना असलेल्या रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बाळेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिराचे जतन आणि संवर्धनात अडचणी येत होत्या. (Dharmaveer Fort)
मुंबई : वरळीतील एसटी ऑफिस वाहतूक सिग्नलवर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. टॅक्सीतून उतरत असतानाच BESTच्या वेट-लीज ...
त्यामुळे धर्मवीर गड संरक्षित करण्याची मागणी होत होती. त्यानुसार धर्मवीर गड राज्य संरक्षित स्मारक करण्याची प्रक्रीया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. आता यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती-सूचनांसाठी कालावधी दिला जाणार असून ही प्रक्रीया पार पाडल्यानंतर धर्मवीर गड हा अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट होईल. (Dharmaveer Fort)