Malegaon : श्रावणसरीला दुरावले पोळ्यावर दुष्काळाचे सावट, यंत्रमाग संकटात ; ‘कसमादेना’च्या अर्थकारणावर परिणाम

Malegaon : यंत्रमाग उद्योग आणि शेती हा कसमादेनाच्या अर्थकारणाचा कणा आहे. पाली, बालोत्रा येथील कापड प्रक्रिया उद्योगावरील प्रदूषणविरोधातील सक्ती आणि गुजरातमधील पूरस्थितीमुळे गेल्या महिन्यापासून यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला आहे. सण आणि मंदीचे कारण देत व्यवसाय काही दिवस बंद ठेवूनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. त्यातच गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे. श्रावणसरीही दुरापास्त झाल्याने पोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे. यामुळे बाजारपेठेत अक्षरशः शुकशुकाट आहे. सण-उत्सव तोंडावर आले असताना ही परिस्थिती ‘कसमादेना’च्या अर्थकारणावर परिणाम करणारी ठरणार आहे.



पोळ्यावर दुष्काळाचे सावट


सर्जा-राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा उत्साहात साजरा करतो. यांत्रिकीकरणाच्या काळातही ग्रामीण भागात पोळ्याचा बाज टिकून आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सणाचा उत्साह दिसून येत नाही. पावसाने ओढ दिल्याने प्रमुख नगदी पीक असलेल्या मक्यासह खरीप पिके करपून लागली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत बागायती भागातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिले. अल्पभूधारक आणि जिरायती शेतकरी हताशपणे पिके करपत असताना पाहत आहेत. पीक वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे.



यंत्रमाग संकटात


यंत्रमाग उद्योजक कामगारांना सांभाळून नुकसान सहन करीत चार-पाच दिवस यंत्रमाग चालवीत आहेत. मात्र, आता परिस्थिती हातघाईवर आल्याचे यंत्रमाग कृती समितीचे अध्यक्ष युसुफ ईलियास यांनी सांगितले. शहरातील काही सामाजिक संघटना मंदीच्या काळात कामगारांना मदत करतात. त्यामुळे थोडा हातभार लागतो; अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. कपड्याला उठाव नसल्याने कारखाने, गोदामे आणि ट्रान्सपोर्ट फुल्ल झाले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात काही आशा असताना अर्ध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेती आणि यंत्रमाग उद्योग सावरणे कठीण दिसत आहे.



सर्जा-राजाच्या साजशृंगार साहित्याच्या दरात वाढ


युद्धस्थिती, दुष्काळ आणि महागाईचा परिणाम पोळ्यावर झाला आहे. सर्जा-राजाच्या साजशृंगार साहित्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाईने शेतकरी, कष्टकरी आणि कामगार त्रस्त झाले आहेत. श्रावण महिन्यात थोडाफार का होईना पाऊस पडेल आणि खरीप पिकांना आधार मिळेल, ही आशा फोल ठरली. काही शेतकऱ्यांनी मका पिकात मेंढ्या चरायला सोडून दिल्या आहेत. कसमादेनामधील कळवण आणि बागलाणचा काही भाग वगळता जिरायती व पावसावर अवलंबून असलेली शेती मोठ्या प्रमाणावर आहे

Comments
Add Comment

PM Modi : 'नाराज फुफाजींना आता काम मिळालं!' PM Modi यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी; नक्की कुणावर साधला निशाणा ?

वडोदरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित 'नमो फॉर विकसित भारत' (Namo For Vikasit Bharat) या

Ashish Shelar : २५ हजार झोपडीधारकांना मोठा दिलासा! ‘अभय योजने’चा विस्तार; आशिष शेलारांचे निर्देश

मुंबई : परिशिष्ट-२ नंतर अपात्र ठरलेल्या झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे अभय योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या

Ashish Shelar : ‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून शिवनेरीतील बांधकामांची तपासणी; अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कारवाई - ॲड. आशिष शेलार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक आणि जागतिक वारसा महत्त्व

Jalgaon : जाहीर केले 51 हजार, हातात दिले फक्त 5,100 ! जळगावात दहीहंडीवरून गोविंदांचा रस्ता रोको

Jalgaon : दहीहंडी उत्सवात सात थर लावून जीवाची बाजी लावणाऱ्या गोविंदांच्या हातात बक्षिसाच्या नावाखाली अवघे 5 हजार 100

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंच्या नोकरीतील ५% आरक्षणाचे सुधारित धोरण मंजूर; मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत खेळाडूंच्या शासकीय, निमशासकीय तसेच इतर क्षेत्रातील

BRICS Summit 2026 : 'ब्रिक्स' परिषदेत रंगणार मोदी-पुतिन द्विपक्षीय चर्चा; सुखोई 'Su-57' लढाऊ विमानांचा करार अजेंड्यावर!

नवी दिल्ली : नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या १८ व्या 'ब्रिक्स २०२६' (BRICS Summit) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे