Mumbai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र उभारणी आणि देशाच्या अखंडतेसाठी काम करत असून संघ कार्यालयावर मोर्चा काढणे सरकार कदापि सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी संघाच्या कार्यालयाऐवजी थेट भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर मोर्चा काढून दाखवावा, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. काँग्रेसने संघ कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी हा हल्लाबोल केला. सरकारविरोधात आंदोलन करायचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पालकमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय किंवा रामगिरी येथे मोर्चे काढावेत, असे त्यांनी सुचवले.(Chandrashekhar Bawankule)
‘वंदे मातरम्’वरून काँग्रेसवर हल्लाबोल
‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरूनही बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. वंदे मातरम् हे भारताची संस्कृती, संस्कार आणि वैभवशाली वारसा जगभरात मजबूत करणारे गीत असल्याचे सांगत, त्याचा अपमान करणे म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाकडून देशाचा अपमान करणे होय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. २०२९ च्या निवडणुकीत जनता या भूमिकेचा जाब विचारेल, असे सांगत भारतात राहायचे असेल तर वंदे मातरम् म्हणावे लागेल, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
नागूपर : नागपूर येथील लालबहादूर शास्त्री हिंदी शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळांचा विकास करून त्या ‘मॉडेल स्कूल’ बनवण्याचा महत्त्वाकांक्षी ...
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे आवाहन
राज्यातील पावसाच्या तुटीमुळे सोयाबीन, कापूस यांसह विविध पिके अडचणीत आली असून शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांत सुमारे ६५ टक्के पाऊस झाला असून ३५ टक्के तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन महसूलमंत्र्यांनी केले आहे.(Chandrashekhar Bawankule)
शर्तभंग करणाऱ्या जिमखान्यांवर कठोर कारवाईचा इशारा
मुंबई, नागपूर आणि राज्यातील अन्य भागांतील जिमखान्यांना देण्यात आलेल्या सरकारी जमिनींच्या वापराबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. ज्या उद्देशासाठी जमीन दिली, त्याचसाठी तिचा वापर होणे बंधनकारक आहे. मात्र, तपासात अनेक जिमखान्यांकडून लीजच्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचे आढळले आहे. मुंबईतील १६ जिमखान्यांसह नागपूर आणि राज्यातील इतर जिमखान्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून मोठ्या प्रमाणावर शर्तभंग झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधितांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिमखान्याच्या जमिनीवर लग्नसमारंभ किंवा इतर अनधिकृत व्यावसायिक वापर होत असेल तर तो थांबवला जाईल. शर्ती नियमित करताना यापुढे नियमांचे उल्लंघन न करण्याची हमी घेतली जाईल आणि पुन्हा शर्तभंग झाल्यास जमीन सरकार जमा करून जिमखाना बंद केला जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला.(Chandrashekhar Bawankule)
मुंबई: लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक असताना आता महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. नागरिकांना ...
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी मोठे कार्य केले आहे. फडणवीस यांनी मागील काळात मराठा समाजाला विशेष आरक्षण मिळवून दिले होते, परंतु तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला ते सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. सध्या EWS च्या १० टक्के आरक्षणात मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. ओबीसी समाजातील ३५३ जातींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असून, ओबीसींचे संरक्षण आणि मराठा समाजाला आरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या सरकार यशस्वीपणे पार पाडत असल्याचा दावा त्यांनी केला.(Chandrashekhar Bawankule)
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे स्पर्धा ...
क्रीडा प्रमाणपत्र गैरव्यवहारावर कडक धोरण
क्रीडा प्रमाणपत्र गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने एक स्पष्ट आणि कडक धोरण निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला होता. क्रीडा कोट्यातून कोणत्याही अपात्र व्यक्तीला शासकीय नोकरीचा लाभ मिळू नये यासाठी कडक नियम करण्यात आले आहेत. या प्रकरणी गैरप्रकार आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हा दाखल करणे, क्रीडा प्रमाणपत्र व नोकरी रद्द करणे, तसेच निलंबन किंवा बडतर्फीची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.(Chandrashekhar Bawankule)





