Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्थ खात्याच्या मागणीसाठी अमित शहांना भेटणार

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपविण्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शाह यांच्या १३ आणि १४ सप्टेंबरच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी बुधवारी रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.


देवगिरी निवासस्थानी बैठक


या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. अर्थ खात्याबाबतच्या पुढील भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरता स्वतःकडे ठेवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे सोपविले जाईल, असे त्यावेळी संकेत देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडेच राहिले आहे. राष्ट्रवादीला अर्थ खाते कधी दिले जाणार, असा प्रश्न माध्यमांनी फडणवीस यांना विचारला होता. त्यावेळी ‘सध्यातरी हे खाते माझ्याकडे आहे’, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले होते..


अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडे कार्यभार


अर्थ खाते राष्ट्रवादीकडे पुन्हा देण्याचा मुद्दा आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेत आला आहे. त्यासाठी केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केल्याचे मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भेटीत अर्थ खात्याची मागणी करण्याची शक्यता आहे. शाह १३ आणि १४ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार असून, संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच दुर्मीळ पोथ्यांच्या प्रदर्शनालाही ते भेट देतील. त्यानंतर वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपविण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचा निर्धार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या

Vishwas Patil News: "दहिहंडीतील लावणी म्हणजे सूज..." , कादंबरीकार विश्वास पाटील यांची टीका

मुंबई: मुंबईमध्ये 'प्रकाशचित्रांतून लोक कलावंतांचे स्मृतीवंदन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अखिल

Minister Nitesh Rane : संजय राऊतांनी आधी मालकाच्या 'लंडन' दौऱ्याचा हिशोब द्यावा - मंत्री नितेश राणे यांचा टोला; ‘मातोश्री’ची तिसरी शाखा लंडनमध्ये

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मत्स्यव्यवसाय व बंदरे

Radhakrushn Vikhe Patil : जरांगेंच्या मुंबईत धडकण्याच्या घोषणेनंतर राज्य सरकार सावध; १२ सप्टेंबरच्या बैठकीकडे लक्ष

मागण्यांची पूर्तता सुरू असल्याची विखे पाटील यांची प्रतिक्रिया मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे

Dhule Crime : धुळे महसूल विभागात खळबळ ! फरार तलाठीसह तिघांना पोलीस कोठडी

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हायवा वाहनातून गौण खनिजाची वाहतूक सुरळीत सुरू राहावी

Navnath Ban : ‘सूर्य्यावर थुंकण्यासारखेच!’ रवींद्र चव्हाणांवरील आरोपांवर भाजप आक्रमक; नवनाथ बणांचे मनसेला चोख प्रत्युत्तर

Mumbai : राजकीय आंदोलनांतून दाखल झालेल्या खटल्यांचा दाखला देत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी भाजपा नेते रविंद्र