दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या प्रकरणामुळे सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. त्याच धर्तीवर ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मराठीमध्ये बाळस धरणे आणि सूज असे दोन शब्द आहेत दोघांचे अर्थ भिन्न आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात खेडापाड्यात जतन करणाऱ्या लोककलांचा गौरव कलेसोबतच आज शहरी भागात दहीहंडीमध्ये जो धांगडधिंगा सुरू आहे, ती म्हणजे लोककला आणि लावणी या कला प्रकाराला पैशांसाठी आलेली सूज आहे."
कॉलनी ऑफीसरवरच नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप एसआरए अभय योजनेत कॉलनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिश्मा सभागृहात उत्साहात बुधवारी संपन्न झाला.लेखक- फोटोग्राफर डॉ. नितीन सोनावणे यांनी लिहिलेल्या आणि छायाचित्रित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांच्या स्मृतींना प्रकाशचित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासोबतच शेखर निरंजन भाकरे आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
सुधार समितीत निर्माण झाला वाद, जोगेश्वरीतील प्रकल्प बाधितांच्या घरांची उभारणी करण्याचे आरक्षण रद्द वगळण्या प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ...
पुस्तक प्रकाशनावेळी मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले की, "लोककला या मानवी मनाला आनंद देणारी ऋषीतुल्य व्यवस्था आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये मानवी मनातल हलकल्लोळ, प्रश्न आणि त्याचे दु:ख याचे निराकारण करण्यासाठी प्रथम ऋषी कुळाची व्यवस्था झाल्याचे दिसून येते पण त्यातूनही मानवी मनला शांतता मिळेन आणि दु:ख निवारण होई ना, तेव्हा पुन्हा कुलदैवत व उपास्य देवतांची रचना करण्यात आली, मात्र त्यानंतर ही मानवी मनला शांतता मिळत नाही हे लक्षात आले व उपास्य दैवते व कुलदेव, कुलस्वमीनीची आराधना करण्यासाठी समाजाने जी व्यवस्था उभी केली ती म्हणजे लोककला होय, असे जाणकरांच्या संशोधनातून पुढे येते आहे. ज्ञान, मनोरंन आणि प्रबोधन तसेच दैवतांची आराधना, उपासना या साठी समाजाने निर्माण केलेली लोकला ही व्यवस्था ऋषीतुल्य आहे, अशा शब्दात मंत्री शेलार यांनी लोकलेचा गौरव केला. तसेच नितीन सोनावणे यांनी अत्यंत परिश्रमपुर्वक अशा अस्सल लोकलावंताना शोधून त्यांचे जीवन कॅमेऱ्यात कैद केले आहे हे काम मोठे आहे त्यामुळेच शासनाने त्यांचे पुस्तक प्रकाशित करुन हा ठेवा जतन करण्याचे काम केले आहे." असेही त्यांनी नमूद केले.