ठाणे : डोंबिवली स्थानकातून (Dombivali Railway Station) सकाळी ७:५६ वाजता सुटलेल्या तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमधून एक महिला प्रवासी अचानक रेल्वे रुळावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत महिलेला केवळ किरकोळ दुखापत झाली असून मोठी दुर्घटना टळली आहे.
दिवा ते मुंब्रा दरम्यान घडली घटना (Diva-Mumbra)
Thane - A woman commuter escaped with minor injuries after falling onto the railway tracks from a packed local train that had departed Dombivli at 7:56 am. The incident occurred between Diva and Mumbra stations. The local was halted for a signal when the woman fell from the… pic.twitter.com/a3y5RNf5hi
— NextMinute News (@nextminutenews7) September 10, 2026
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या (People Education Society) विश्वस्तपदी महाराष्ट्र ...
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
महिला रुळावर पडल्याचे दिसताच ट्रेनमधील आणि आसपासच्या प्रवाशांमध्ये एकाच वेळी प्रचंड घबराट पसरली. मात्र, प्रसंगावधान राखून इतर प्रवाशांनी लगेचच मदतीसाठी पुढाकार घेतला. महिला सुखरूप असल्याचे आणि तिला फक्त किरकोळ दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला.
लोकलमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मध्य रेल्वेवर सकाळी पीक अव्हर्समध्ये ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.