Nashik : भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याच्या विरोधात दाखल असलेल्या प्रकरणांनंतर आता कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही मुंबईतील विशेष न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे अशोक खरात आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांविरोधात मनी लॉन्ड्रिंगचे प्रथमदर्शनी प्रकरण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्व सहा आरोपींविरुद्ध पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले असून, २२ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सुधार समितीत निर्माण झाला वाद, जोगेश्वरीतील प्रकल्प बाधितांच्या घरांची उभारणी करण्याचे आरक्षण रद्द वगळण्या प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ...
गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा मालमत्ता व्यवहारात वापर ?
विशेष न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, आरोपींनी जबरदस्तीने वसूली आणि गुन्हेगारी धमकीसह अनुसूचित गुन्ह्यांमधून कथितरित्या मिळवलेल्या रकमेचा वापर मालमत्ता संपादन आणि तिच्या व्यवहारांमध्ये केला. न्यायालयाने म्हटले की, रेकॉर्डमध्ये आरोपींनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता संपादन केल्याचे प्रथमदर्शनी संकेत मिळतात. कोर्टाने हेही म्हटले की एकच पद्धत वारंवार वापरली गेली. त्यामुळे प्रथमदर्शी असे संकेत देतात की गुन्ह्यातून मिळालेली रक्कम म्हणजे Proceeds of Crime व्यवस्थितरीत्या जमा केली गेली आणि हा प्रकार एखाद्या एकमेव घटनेपुरता मर्यादित नसून, त्यामागे एक पद्धतशीर व्यवहार असल्याचे संकेत रेकॉर्डवरून मिळत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
Nashik News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबांकडून नागरिकांची फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशोक खरातच्या प्रकरणाने नाशिक जिल्हा ...
सहा आरोपींविरोधात प्रक्रिया सुरू
न्यायालयाने अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, नामकरण आवारे, अविनाश कांडेक आणि मिलिंद बंकर या सहा जणांविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला आहे. सर्व सहा आरोपींना २२ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.जबरदस्तीने वसुली, चुकीच्या पद्धतीने बंधक बनवणे आणि गुन्हेगारी धमकी यांसारख्या आरोपांशी संबंधित FIR च्या आधारे ED ने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला होता. या FIR मध्ये महाराष्ट्रातील अंधश्रद्धाविरोधी कायद्यातील कलमांचाही समावेश असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान कथित गुन्ह्यातून मिळालेली रक्कम तसेच त्या पैशांशी संबंधित मालमत्ता व्यवहारांची ED कडून चौकशी करण्यात आली.
Pune Crime : ज्या वयात नव्या संसाराची स्वप्नं रंगवायची, त्याच वयात एका नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या कोथरूड ...
आता २२ सप्टेंबरला सुनावणी
दरम्यान, विशेष न्यायालयाच्या आदेशामुळे अशोक खरात आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, न्यायालयाने नोंदवलेले हे प्रथमदर्शनी निरीक्षण असून, आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. आता २२ सप्टेंबर रोजी सर्व सहा आरोपी न्यायालयात हजर राहिल्यानंतर या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.