Bank Robbery Case : नागपुरात फिल्मी स्टाईल बँक लूट; कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून....लाखांची रोकड लांबवली, सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद

नागपूर: नागपूर शहरातून एका बँक लुटीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत एका अज्ञाताने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि पोलिसांच्या तडकाफडकी कारवाईमुळे आरोपी अवघ्या काही वेळातच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.(Bank Robbery Case)



बँकेची वेळ संपल्यानंतर आरोपीचा प्रवेश


ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. बँकेचे कामकाज संपल्यानंतर सूरज बोरकर नावाचा आरोपी चेहऱ्यावर कापड बांधून बँकेच्या शाखेत शिरला. त्याने अचानक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे बँकेत एकच गोंधळ उडाला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपीने कर्मचाऱ्यांच्या हातातील ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावली आणि पळ काढला.(Filmy-style bank robbery in Nagpur)



कर्मचाऱ्यांचा पाठलाग आणि पोलिसांची कारवाई


आरोपी बँकेतून बाहेर पडताच कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत त्याचा धाडसाने पाठलाग केला. तसेच तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही वेगाने सूत्रे हलवत बँकेपासून काही अंतरावरच आरोपीला जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्याकडून लुटलेली संपूर्ण ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून, त्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे.(Bank Robbery Case)





आधीच केली होती रेकी?


प्राथमिक तपासानुसार, आरोपीने या गुन्ह्यापूर्वी बँकेची रेकी केली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एटीएममध्ये पैसे कधी जमा केले जातात, याची माहिती मिळवूनच त्याने बँकेजवळ दबा धरून योग्य संधीची वाट पाहिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.(Filmy-style bank robbery in Nagpur)



CCTV मध्ये कैद झाला थरार


या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे. यामध्ये आरोपी चेहऱ्यावर कापड बांधून बँकेत प्रवेश करताना, बॅगेतून मिरची पूड काढून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातफेकताना आणि त्यानंतर कर्मचारी सैरावैरा धावताना स्पष्टपणे दिसत आहेत. सक्करदरा पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.(Bank Robbery Case)

Comments
Add Comment

सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांवरील निर्बंध घेतले मागे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशांचे पालन

WPL 2027: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचं बिगुल वाजलं, असं आहे वेळापत्रक; सर्व माहिती एका क्लिकवर

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी नुकतीच मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. या लिलाव प्रक्रियेनंतर स्पर्धा

Dhanteras: धनत्रयोदशी म्हणजे काय? त्यामागील कथा तुम्हाला माहित आहे का?

Dhanteras Katha: दिवाळी सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा

न्यूझीलंडच्या 11व्या क्रमांकाच्या खेळाडूसोबत गुरनूर ब्रारचा राडा! बाद करण्यासाठी अशी क्लुप्ती वापरली Video

भारताने न्यूझीलंडला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 185 धावांचं

फास्ट ट्रॅक न्यायालयांचा मोठा विस्तार! देशात 850 विशेष न्यायालये उभारण्यास केंद्राची मंजुरी; 5 वर्षांची मुदतवाढ

नवी दिल्ली: देशभरात बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार (पॉस्को) प्रकरणांना चाप लावण्यासाठी आणि खटल्यांची

Diwali Cleaning: दिवाळीसाठी करा एका दिवसात साफसफाई; कशी ते जाणून घेऊया

Diwali Cleaning: दिवाळीला अवघे काही तास उरले आहेत. परंतु अजूनही घराची साफसफाईही करायची बाकी आहे, वेळ कमी असल्यामुळे धावपळ