Friday, September 11, 2026

Lalbaugcha Raja 2026 : 'लालबागच्या राजा'चं प्रथम दर्शन आज; राजाच्या फर्स्ट लूकसाठी भाविकांची उत्सुकता शिगेला!

Lalbaugcha Raja 2026 : 'लालबागच्या राजा'चं प्रथम दर्शन आज; राजाच्या फर्स्ट लूकसाठी भाविकांची उत्सुकता शिगेला!

Mumbai : मुंबईसह जगभरातील गणेशभक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'लालबागचा राजा २०२६'चे पहिले दर्शन आज, शुक्रवारी (११ सप्टेंबर) घडणार आहे. लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आज संध्याकाळी ७ वाजता बाप्पाच्या विलोभनीय रूपाचे अनावरण केले जाईल.(Lalbaugcha Raja 2026)

संध्याकाळी ७ वाजता होणार पहिली झलक सादर

लालबाग मार्केट, परळ येथील मुख्य मंडपात हा सोहळा पार पडणार आहे. अनावरणापूर्वी मंडळाने माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष फोटो सेशनचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले ९३ वे वर्ष साजरे करत असून, १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव रंगणार आहे.(Lalbaugcha Raja 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >