BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष भारतात दाखल; पंतप्रधान मोदींसोबत आज महत्त्वाची द्विपक्षीय बैठक

नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे.(BRICS Summit 2026)



पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्यातील संबंध


यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (ACO) शिखर परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली होती. या प्रदेशात दीर्घकाळ शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. तसेच ब्रिक्स आणि एससीओसारख्या बहुपक्षीय संघटनांमध्ये इराणसोबत एकत्रितपणे काम करण्याची भारताची तयारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.(Iran President India Visit)



व्यापार आणि ऐतिहासिक संबंधांवर भर


इराणसोबतचा द्विपक्षीय व्यापार वाढवणे आणि त्यात विविधता आणणे यासाठी नवी दिल्ली कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले असून विविध क्षेत्रांमधील ऐतिहासिक संबंध आणखी दृढ करण्याच्या भारताच्या भूमिकेवरही त्यांनी भर दिला आहे.(BRICS Summit 2026)



इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिय


इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्या अजेंड्यावर भाष्य केले. बहुपक्षीय कूटनीतीमुळे द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीला आणखी वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतासोबत परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये संवाद आणि विचारविनिमय सुरू ठेवण्याची संधी आम्ही निश्चितच वापरू.”(Iran President India Visit)


एससीओ शिखर परिषद आणि ब्रिक्ससारख्या प्रमुख बहुपक्षीय गटांमध्ये भारताची प्रभावी भूमिका असल्याचेही बघाई यांनी अधोरेखित केले. भारत हा शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्स या दोन्ही संघटनांचा सदस्य असून, व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या बाबतीत भारतासोबतचे संबंध अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.(BRICS Summit 2026)



चाबहार बंदराला प्राधान्य


चर्चेच्या प्रमुख मुद्द्यांवर बोलताना त्यांनी कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांना, विशेषतः चाबहार बंदराला, दोन्ही देशांसाठी सर्वाधिक प्राधान्य असल्याचे सांगितले. इराण आणि भारत यांच्यातील चर्चेत चाबहार बंदराचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून दोन्ही देशांमधील संबंध अतिशय चांगले आहेत आणि ते सातत्याने अधिक दृढ होत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.(BRICS Summit 2026)

Comments
Add Comment

Assam Elephant Rescue : टायरच्या विळख्यात अडकला हत्ती; वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी वाचला जीव!

आसाम : गोलाघाट जिल्ह्यात एका जंगली हत्तीच्या मानेभोवती ट्रॅक्टरचा मोठा टायर अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली

Nanded accident : नांदेडच्या भीषण अपघाताने देश हादरला! पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख, जखमींना ५० हजारांची मदत

नांदेड जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाट परिसरात

Bank Holiday : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून सलग सुट्ट्या, अनेक राज्यांत बँका काही दिवस बंद राहणार

नवी दिल्ली: बँकेत महत्त्वाचं काम असेल तर ग्राहकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. बँक कर्मचारी संघटनांनी

9/11 Attack : 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आठवले स्वामी विवेकानंद; सहिष्णुतेचा संदेश पुन्हा चर्चेत

नवी दिल्ली : अमेरिकेतील 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना 25 वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान

BRICS Summit 2026 : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात; पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकीत 'या' क्षेत्रांवर भर

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाले असून, ब्रिक्स शिखर

E commerce rules : ई-कॉमर्स क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नवे नियम जाहीर; ग्राहक संरक्षण मजबूत होणार, सुधारित नियम..... पासून लागू

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल बाजारपेठेत पारदर्शकता