Dhule Crime : दारूच्या नशेत पित्याचा संताप अनावर ! दोन चिमुकल्या मुलींवर थेट काचेच्या बाटलीने...

Dhule Crime : दारूच्या नशेत स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलींवर काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्यावरील पुलाखाली घडली. या प्रकरणी पित्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात (Songir Police Station) खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश आत्माराम सोलंकी (वय २१, रा. काबरी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. या हल्ल्यात त्याच्या दोन मुली नित्या दिनेश सोलंकी (वय २) आणि दिव्या दिनेश सोलंकी (वय ४) जखमी झाल्या आहेत. दोन्ही मुलींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे.



पुलाखाली काचेच्या बाटलीने वार


पोलिसांच्या माहितीनुसार, दिनेश सोलंकी हा आपल्या कुटुंबासह बाभळे फाट्यावरील पुलाखाली आला होता. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचा आरोप आहे. कोणत्यातरी कारणावरून संतापलेल्या दिनेशने आपल्या दोन्ही मुलींवर काचेच्या बाटलीने वार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या हल्ल्यात दोन्ही मुलींच्या डोक्याला दुखापत झाली.



आईने दाखल केली तक्रार


घटनेनंतर मुलींची आई राधिका दिनेश सोलंकी यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दिनेश सोलंकी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, जखमी मुलींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून, हल्ल्यामागील नेमकं कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.



व्यसनाधीनतेमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न


दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक तणाव आणि व्यसनाधीनतेमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जखमी मुलींच्या वैद्यकीय अहवालानंतर पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार असून, सोनगीर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Somalia Attack: सोमालियात अल-कायदाशी संबंधित अल-शबाबच्या भीषण हल्ल्यात 20 सैनिकांचा मृत्यू, लष्कराच्या दाव्याने खळबळ

मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या

WPL 2027 Auction Live: सोफी मोलिन्यूसाठी युपी वॉरियर्सने मोजले 1.10 कोटी

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी

INDW Vs ZIMW: टी20 नंतर झिम्बाब्वेला वनडे मालिकेत क्लिन स्विप, स्मृती मंधानाच्या नेतृत्वात विजयी घोडदौड

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी येथे पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल

AUS vs SA Test Match: स्टार्क समाधानी, पण ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर काय म्हणाला?

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने

बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशनवरून वाद; स्काउटने लव्हला केलं नॉमिनेट, लव्ह गिल भावूक

बिग बॉसच्या सीजन 20 मध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. टास्कदरम्यान होणारी भांडणं, मैत्री यामुळे हा सीजन अधिक

Nashik : नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित

Nashik : कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील