Dr. Manisha Jejurkar Case : डॉ मनिषा जेजुरकर यांची आत्महत्या नाही तर हत्या ? हायकोर्टाच्या निरीक्षणाने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; नीलेश जेजुरकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Dr. Manisha Jejurkar Case : नाशिकमधील डॉक्टर मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ आणि जेजुरीकर यांचे पती डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. महत्त्वाचे म्हणजे अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) धक्कादायक निरीक्षण नोंदवले आहे. ही घटना केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याची नसून हत्येची असण्याची दाट शक्यता न्यायालयाने व्यक्त केली आहे. डॉ. नीलेश याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याला गंगापूर पोलिसांमार्फत अटक होण्याची शक्यता आहे.



नेमकं प्रकरण काय ?


६ मार्च रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा (वय ४०) यांनी आत्महत्या केली होती. तपासात व सुनावणीत समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. नीलेश याचे एका महिला डॉक्टरसोबत विवाहबाह्य संबंध होते. आणि या कारणातून डॉ. मनीषा यांचा सतत मानसिक छळ सुरू होता, असा आरोप फिर्यादी व सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला. तर, ५ मार्च रोजी डॉ. मनीषा यांच्या चुलत बहिणीच्या लग्नात डॉ. नीलेशने कौटुंबिक फोटो काढण्यास नकार देऊन उपस्थितांसमोर डॉ. मनीषा यांचा अपमान केला होता. जानेवारी मध्ये संशयिताच्या डॉक्टर मैत्रिणीने डॉ. मनीषा यांना फोन करून तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस, तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे, अशा शब्दांत हिणवले होते. त्यामुळे अपमान आणि आत्महत्या या दोन घटनांमध्ये अत्यंत कमी वेळ असल्याने, आत्महत्येस चिथावणी देणे किंवा गुन्हेगारी हेतू असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होते. अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली. (Dr. Manisha Jejurkar Case)



नीलेश जेजुरकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला


मानसोपचार तज्ज्ञ संशयित डॉ. नीलेश जेजुरकर हा ९ मार्चपासून नाशिक शहरातून पसार होता. काही महिन्यांपासून तो पुन्हा शासकीय सेवेत रूजू झाला असून पत्नी डॉ. मनीषा जेजुरकर यांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दरम्यान, या प्रकरणात नाशिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नीलेशने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा अर्ज न्यायाधीश माधव जामदार यांनी फेटाळला आहे. अर्जात कोणतेही तथ्य किंवा आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जेजुरकरच्या वकिलांनी संबंधित आदेशाला स्थगिती देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. परंतु, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने ही विनंतीदेखील फेटाळली आहे. (Dr. Manisha Jejurkar Case)



डॉ. नीलेश अटकेची टांगती तलवार


डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर (Dr. Nilesh Jejurkar) याच्या अटकपूर्व जामीन (anticipatory bail rejected) अर्जावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) धक्कादायक निरीक्षण नोंदवले आहे. ही घटना केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याची नसून हत्येची असण्याची दाट शक्यता न्यायालयाने व्यक्त केली आहे. दरम्यान डॉ. नीलेश याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याला गंगापूर पोलिसांमार्फत अटक होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

BRICS Summit : BRICS परिषदेसाठी शी जिनपिंग भारतात दाखल ! शी जिनपिंग भारतात काय काय घेऊन आले ?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल

Shiv Sena Express : ‘शिवसेना एक्सप्रेस’ला आमदार निलेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी आमदार

Nashik E-bus : पर्यावरणपूरक ई-बसेसच्या रूपाने नवे पर्व ! ई-बसेसची नियमित सेवा मंगळवारपासून सुरू होणार

Nashik E-bus : नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाच्या पीएम-ई बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी दाखल

मोदी-जिनपिंग भेटीदरम्यान मोठी घडामोड! ६ वर्षांचा दुरावा संपला, भारत-चीन विमानसेवा पुन्हा सुरू

नवी दिल्ली: भारत आणि चीन दरम्यानचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध पुन्हा एकदा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे

Nashik Kumbhmela : रस्ते कामांची कुंभ आयुक्त शेखर सिंह, आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून पाहणी, गुणवत्तापूर्ण कामासह वाहतूक व उपयोगिता सेवांच्या समन्वयावर भर

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरू असलेल्या रस्ते व पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा

Eknath Shinde in London : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भलतीच क्रेझ! परदेशात वडापाव खातानाचा भन्नाट अंदाज कॅमेऱ्यात कैद

लंडन: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आपला दोन दिवसांचा यूके दौरा पूर्ण केला.