Sunday, September 13, 2026

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला असून डोंबिवलीहून कसाऱ्याकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. (Central Railway)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता.१३) रोजी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा डाऊन लाईनची सेवा विस्कळीत झाली असून डोंबिवलीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म १ आणि २ प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे. (Central Railway)

कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कसारा दिशेकडील डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. अचानक झालेल्या या बिघाडामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना काही काळ खोळंबा सहन करावा लागला. (Central Railway)

दरम्यान, बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. युद्धपातळीवर ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने दुरुस्तीच्या कामादरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३, ४ आणि ५ वरील विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला. या तांत्रिक बिघाडामुळे कल्याण स्थानकातील रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. लोकल तसेच काही एक्स्प्रेस गाड्या सुमारे ४५ मिनिटे रखडल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. (Central Railway)

या काळात रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरून चालवण्यात आल्या. दरम्यान, ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक पथकाकडून वेगाने काम सुरू होते. बिघाड दूर झाल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. (Central Railway)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >