Monday, September 14, 2026

Ganpati miravnuk accident : छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघात; गणपती मिरवणुकीत कंटेनर घुसल्याने दोन गणेशभक्त ठार, १२ जण जखमी

Ganpati miravnuk accident : छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघात; गणपती मिरवणुकीत कंटेनर घुसल्याने दोन गणेशभक्त ठार, १२ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर:णपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात आणि आनंदा वातावरणात सुरू असलेल्या मिरवणुकीत एका भरधाव कंटेनरने शिरकाव केल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावरील पिंप्रीराजा गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एका ७ वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.(Ganpati miravnuk accident)

नेमकी घटना कशी घडली?

पिंप्रीराजा गावाजवळ गणेशमूर्ती स्थापनेची मिरवणूक अत्यंत उत्साहात सुरू होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. मात्र, यादरम्यान अचानक एका भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरूनच हा कंटेनर तीन गतिरोधक ओलांडून आणि झेंड्याचा चबुतरा तोडत थेट मिरवणुकीत शिरला. वाटेत एका दुचाकीला फरफटत नेत हा कंटेनर थेट गणेशभक्तांवर चालला गेला. या अचानक घडलेल्या भीषण अपघातामुळे आनंदाचे वातावरण क्षणात आक्रोशात आणि किंकाळ्यांमध्ये बदलले.(Ganpati miravnuk accident)

मृत आणि जखमींची माहिती

या अपघातात प्राण गमावलेल्या गणेशभक्तांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • विठ्ठल रामभाऊ जाधव (वय ४९, रा. पिंप्रीराजा)

  • रमेश लहूजी बनसोडे (वय ४५, रा. पिंप्रीराजा) - हे स्वतः एक ट्रकचालक असून गणेशोत्सवासाठी गावी आले होते.

जखमींवर उपचार: अपघातात जखमी झालेल्या एकूण १२ जणांवर सध्या जिल्हा रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका ७ वर्षांच्या लहान मुलासह दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.(Ganpati miravnuk accident)

संताप आणि हळहळ

या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने भरधाव कंटेनरचा चालक किशोर घुले याला बेदम मारहाण केली. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने हळवे वातावरण निर्माण झाले आहे.(Ganpati miravnuk accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >