Monday, September 14, 2026

Varun Chakravarthy : भारताला मोठा धक्का; फिरकीपटू वरुण चक्रवर्ती अफगाणिस्तान मालिकेमधून आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता

Varun Chakravarthy : भारताला मोठा धक्का; फिरकीपटू वरुण चक्रवर्ती अफगाणिस्तान मालिकेमधून आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो चालू मालिकेतून बाहेर पडला आहे. रविवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.(Varun Chakravarthy)

एमआरआय अहवालात दुखापती स्पष्ट

पहिल्या टी-२० सामन्यात वरुणने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ १६ धावा देऊन १ बळी टिपला होता. मात्र, सामन्यानंतर त्याच्या पाठीच्या स्नायूंमध्ये (Side Strain) ताण आल्याचे जाणवले. त्यानंतर करण्यात आलेल्या एमआरआय (MRI) तपासणीत दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला उर्वरित मालिकेतून बाहेर बसावे लागले आहे.(Varun Chakravarthy)

आशियाई क्रीडा स्पर्धेवरील अनिश्चिततेचे सावट

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरून वरुणने संघात पुनरागमन केले होते. मात्र, या ताज्या दुखापतीमुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच्या सहभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (Centre of Excellence) दुखापत व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वरुण आता पुढील उपचारांसाठी आणि तंदुरुस्तीसाठी पुन्हा बंगळुरूमधील केंद्राकडे रवाना होणार आहे.(Varun Chakravarthy)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >