Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी ती थेट बुडापर्यंत तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री साधारण दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित झाडांची छाटणी करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Nashik : सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आता सर्वसामान्य नागरिकच नाही तर कलाकार, उद्योगपती यासंह ...
सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहन कैद
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने परिसराची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी झाडे बुडापर्यंत तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या फुटेजमध्ये एमएच १५ जेसी ५८३८ क्रमांकाचे ‘छोटा हत्ती’ वाहन दिसून आले आहे. वाहनाच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
Nashik Accident News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत ...
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची तयारी
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी झाडांची अनधिकृत छाटणी केली असून, काही झाडे बुडापर्यंत तोडण्यात आली आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाला मिळाले असून, त्याआधारे संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील झाडांची अनधिकृत तोड किंवा छाटणी करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. त्यामुळे या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रशासन संबंधितांपर्यंत कसे पोहोचते आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





