Nashik News : नाशिक जिल्ह्यात प्रांताधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा आरोप करत तब्बल 800 तलाठी (Talathi) आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. ...
ठाण्याकडून घोडबंदर गुजरात रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कासारवडवली ओव्हर ब्रिजचे सुरवातीलाच 'प्रवेश बंदी' करण्यात आली आहे. त्यामुळे जड- अवजड वाहनांना आज मध्यरात्रीपासून, ठाणे दिशेकडून घोडबंदर गुजरात रोडच्या दिशेने जाण्यासाठी कासारवडवली ओव्हर ब्रिज लगतच्या स्लिप रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. शिवाय, हलक्या वाहनांकरिताही पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. ठाणे दिशेकडून घोडबंदर गुजरात रोडच्या दिशेने जाणारे छोटी वाहने (कार, ऑटो रिक्षा, टु व्हिलर, पोलीस व्हॅन, फायर ब्रिगेडची गाडी, रूग्णवाहिका, गणेश मुर्ती विर्सजनातील वाहने आणि इतर अत्यावश्यक वाहने) ह्यांना विजय गार्डनजवळील डी मार्ट आणि कासारवडवली पोलीस स्टेशनच्या पुढे उजवीकडे वळण घेऊन सरळ ग्रॅन्ड स्क्वेअर चौक, विहंग व्हॅली चौक, टायटन हॉस्पिटल येथून डावे वळण घेऊन ठाणे घोडबंदर मुख्य वाहिनीवरून पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.🚨 वाहतूक अधिसूचना | कासारवडवली कासारवडवली ओव्हर ब्रिज येथे Inspection कामासाठी दि. १५/०९/२०२६ रोजी रात्री २४:०० वा. पासून वाहतूक बदल करण्यात येत आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. #ThanePolice #TrafficUpdate #ThaneTraffic #Kasarvadavali pic.twitter.com/HJCaYCfZzm
— ठाणे पोलीस.. Thane Police (@ThaneCityPolice) September 15, 2026
ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणेकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. गायमुख ...






