मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि शहरामध्ये गणेशभक्तांकडून दीड दिवसांच्या ...
ठाण्यात वाहतुकीचे प्रमाण वाढत असताना आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांची मागणी वाढत असतानाच, ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जर डिसेंबरपासून मेट्रो सेवा सुरू झाली तर, हा मेट्रो मार्ग वेगाने विकसित होत असलेल्या निवासी भागांमधून ठाण्याच्या प्रमुख भागांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो. सरनाईक म्हणाले की, ही यशस्वी चाचणी डिसेंबरपर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी सुद्धा ठाणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आली. ठाणेकरांच्या सेवेमध्ये मेट्रो आल्यास हजारो ठाणेकरांना ट्रॅफिकमधून दररोज करावा लागणारा प्रवास कायमचा बंद होईल. पिक अवरच्या काळामध्ये मोठ्या संख्येने गाड्यांची आणि नोकरदारांची एकच गर्दी असते.ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी! गायमुख ते कापूरबावडी या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे.
या मार्गामुळे गायमुख, कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन,… pic.twitter.com/XsPtAfDt81 — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 12, 2026
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2026) दरवर्षी लाखो भाविकांची रीघ लागते. या भव्य सोहळ्याचे आणि ...




