Nashik News : निलंबनाच्या कारवाईविरुद्ध नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, प्रांताधिकाऱ्याविरोधात 800 तलाठी अन् ग्रामसेवक एकवटले

Nashik News : नाशिक जिल्ह्यात प्रांताधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा आरोप करत तब्बल 800 तलाठी (Talathi) आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे, जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फेरफार नोंदी आणि महसूल कामकाजात अनियमितता असल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपूरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी इगतपुरी तालुक्यातील एक मंडलाधिकारी व पाच तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. वेतनवाढही रोखली होती. या कारवाईविरोधात तलाठ्यांनी मिळून पवन दत्ता यांच्याविरोधात एल्गार पुकारला असून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे.



...तर कामबंद आंदोलनाचा इशारा


प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. प्रांताधिकार्‍यांनी बेकादेशीर निलंबन केल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. प्रशासकीय सेवेतील आपल्या विविध मागण्यांसाठी 15 तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एकत्र येत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध जवळपास 800 तलाठी व ग्रामविकास अधिकारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nashik District Collector's Office) धरणे आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास बुधवार पासून कामबंद आंदोलन केलं जाईल असा इशाराही तलाठी महासंघाने दिला आहे.

Comments
Add Comment

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियमांत बदल

- नामनिर्देशन फेटाळल्यास अपिलाच्या तरतुदीत बदल; नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत एकवाक्यता

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर नवा विक्रम, ९० टन आयात माल घेऊन Boeing 777F दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५

Kasarvadavali Flyover: ऐन गणेशोत्सवात ठाणेकरांची वाहतूक कोंडी वाढली, कासारवडवली ओव्हर ब्रिज बंद

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये ठाणेकरांना आणखीन वाहतूक

SRK Reacts on Dhurandhar : किंग खानही झाला ‘धुरंधर’चा फॅन! म्हणाला, 'मी या चित्रपटाचे...'

मुंबई : रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ या सिनेमाने २०२५ आणि २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा निर्माण केली. दमदार

UPI Rules : UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार का? जाणून घ्या सरकारचे नियम

मुंबई : भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या माध्यमांपैकी एक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध