Tuesday, September 15, 2026

Amit Shah Ganpati Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चे दर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

Amit Shah Ganpati Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सहकुटुंब 'लालबागच्या राजा'चे दर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती

लालबागच्या राजाचरणी नतमस्तक

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांनी बाप्पाच्या चरणी मस्तक ठेवून देशवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दर्शन सोहळ्यात अमित शाह यांच्यासह त्यांचा परिवार आणि नातूदेखील उपस्थित होता, ज्याचे काही विशेष क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. दर्शन घेऊन मंडपातून बाहेर पडत असताना रांगेत उभे असलेल्या भाविकांनी त्यांना हात दाखवून अभिवादन केले, ज्यावर अमित शाह यांनीही स्मितहास्य करत सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. ((Amit Shah Ganpati Darshan)  )  

दिग्गजांची विशेष उपस्थिती

लालबागच्या राजाच्या मंडपात पोहोचलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गणेश मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन बाप्पाला वंदन केले.(Amit Shah Ganpati Darshan)     

दौरा आटोपून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांच्या या गणेशदर्शन सोहळ्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >