- रामदास कदम यांचा सवाल; बाळासाहेबांच्या नावाला कलंक लावल्याची टीका
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्या रात्रीच्या येण्या-जाण्याच्या वेळांवर प्रश्न उपस्थित करीत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ते कुठे असायचे, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच, या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणीही कदम यांनी केली. (Ramdas Kadam)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या; माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबई : ...
दिशा सालियन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता डिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना कदम यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. “सत्यमेव जयते! जे सत्य होतं ते न्यायालयाच्या माध्यमातून पुढे आलं,” असे कदम म्हणाले. (Ramdas Kadam)
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचे काम झाले आहे का, याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली. त्याचबरोबर “आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता कुठे जायचे आणि सकाळी सहा वाजता परत यायचे? त्यांची नाईट लाईफ रात्रीच्या वेळेला कुठे असायची, याचीही चौकशी झाली पाहिजे,” असे कदम यांनी म्हटले. या बाबींची चौकशी झाल्यास आणखी काही गोष्टी समोर येतील, असा दावाही त्यांनी केला. (Ramdas Kadam)
रियाध: सौदी अरेबियाने आपल्या खनिज संपत्तीमध्ये एक मोठी भर घातली असून, मदिनातील जबल सईद भागात सुमारे ११ कोटी टन धातुक (अयस्क) संसाधने सापडल्याचा दावा ...
कदम म्हणाले, “बाळासाहेबांच्या नातवाचे रात्रीचे काय धंदे सुरू होते, हे अवघ्या महाराष्ट्राला कळले पाहिजे. बाळासाहेबांनी कमावले; पण या सगळ्या लोकांनी गमावले. बाळासाहेबांनी हिंदू लोकांना न्याय देण्याचे काम केले आणि या लोकांनी बाळासाहेबांच्या नावावर कलंक लावण्याचे काम केले,” असा आरोप कदम यांनी केला. (Ramdas Kadam)