Jalgaon Crime News : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह पद्मालय जंगलात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कविता अरुण मिस्त्री असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मित्रानेच दगडाने चेहरा ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jalgaon Crime News)
८ सप्टेंबरपासून महिला बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, कविता मिस्त्री या ८ सप्टेंबरपासून संशयास्पदरित्या बेपत्ता होत्या. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी पद्मालय जंगलात कविता मिस्त्री यांचा मृतदेह आढळून आला. (Jalgaon Crime News)
Jalgoan Crime News : घरोघरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. दरम्यान गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारीत असलेल्या एका कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. ...
‘दवाखान्यात घेऊन जातो’ म्हणत दुचाकीवर नेले अन्...
कविता मिस्त्री (Kavita Mistry) आणि नरेश ऊर्फ आबा अनिल सोनवणे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. कविता बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर नरेशने ‘दवाखान्यात घेऊन जातो’ असे सांगून कविता यांना दुचाकीवरून सोबत नेले. घराबाहेर पडताना कविता यांनी आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून आपण नरेशसोबत जात असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता म्हसावद येथे त्यांचे शेवटचे लोकेशन आढळून आले. त्यानंतर दोन्ही मोबाईल बंद झाले होते.(Jalgaon Crime News)
संशयिताला जळगावातून ताब्यात घेतले
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी नरेश सोनवणे याचा माग काढला आणि त्याला जळगावातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात कविता मिस्त्री यांच्यावर दगडाने वार केल्याची माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. सध्या पोलिसांकडून संशयिताची कसून चौकशी सुरू असून, या हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.






