Tuesday, September 15, 2026

Jalgoan Crime News : एकीकडे बापाच्या आगमनाचा उत्साह, दुसरीकडे खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंबियांना बसला धक्का ! खोलीत...

Jalgoan Crime News  : एकीकडे बापाच्या आगमनाचा उत्साह, दुसरीकडे खोलीचा दरवाजा उघडताच कुटुंबियांना बसला धक्का ! खोलीत...

Jalgoan Crime News : घरोघरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले. दरम्यान गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारीत असलेल्या एका कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. जळगावच्या दशरथनगर परिसरातील तळेले कॉलनीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपल्या राहत्या घरी आयुष्य संपवल्याचं दुर्दैवी घटना समोर आली आहे. घरी गणपती बाप्पाच्या स्थापनेची घरात तयारी सुरू असतानाच महिलेने ४ वर्षाच्या मुलासह आयुष्य संपवलय. हेमांगी निखिल महाजन आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा शौर्य महाजन अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. हेमांगी यांचे पती निखिल महाजन हे सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवेत आहेत. (Jalgoan Crime News)

नेमकं काय घडलं ?

सोमवारी सायंकाळी घरासह गल्लीतील मंडळाची गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू असताना कुटुंबीय पूजेच्या तयारीत व्यस्त होते. याचदरम्यान हेमांगी या मुलाला घेऊन खोलीत गेल्या. पूजा सुरू होण्याची वेळ झाली तरी त्या बाहेर आल्या नाही त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना बोलावण्यासाठी खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही आवाज न आल्याने आणि बराच वेळ दरवाजा वाजूनही कुटुंबियांना संशय आला. संशय आल्याने कुटुंबीयांनी शनिपेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खोलीत माय-लेकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दोघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. (Jalgoan Crime News)

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

दरम्यान, माय-लेकाने एकाच साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात (Shanipeth Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >