Thursday, September 17, 2026

Beed Pune direct train : ऐतिहासिक क्षण! बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा दिमाखदार शुभारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचेही भूमिपूजन

Beed Pune direct train : ऐतिहासिक क्षण! बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा दिमाखदार शुभारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचेही भूमिपूजन

बीड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत आजचा दिवस बीडकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक, आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या 'बीड-पुणे' थेट रेल्वेसेवेचा शानदार शुभारंभ राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या महत्त्वपूर्ण सोहळ्यात “रेल संख्या ०१४०१ प्रस्थान के लिए तयार है” हा आवाज परिसरात घुमताच उपस्थितांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला.(Beed Pune railway inauguration)

[caption id="attachment_1059655" align="alignnone" width="696"]Beed-Pune railway Beed-Pune railway[/caption]

बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

बीड जिल्हा अनेक दशके रेल्वे नकाशापासून दूर राहिल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून आज सुरू झालेल्या या थेट रेल्वेसेवेमुळे बीडकरांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.(Beed Pune railway inauguration)

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना, पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवास करता येईल, असा शब्द देण्यात आला होता. आज तोच शब्द पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. तसेच, आगामी काही महिन्यांत बीड ते पनवेल थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. बीड-परळी मार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग थेट दक्षिण भारताशी जोडला जाईल, ज्यामुळे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला.(Beed Pune railway inauguration)

[caption id="attachment_1059656" align="alignnone" width="696"]Grand launch of the direct Beed-Pune railway service; inaugurated by Deputy Chief Minister Sunetra Pawar. Grand launch of the direct Beed-Pune railway service; inaugurated by Deputy Chief Minister Sunetra Pawar.[/caption]

सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाला मोठी चालना

रेल्वेच्या शुभारंभासोबतच बीड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही मोठ्या उत्साहात पार पडले:

  • यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नूतनीकरण: स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुन्या भिंती कायम ठेवून येथे अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड इकोस्टिक, सेंट्रल एसी, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत.(Beed Pune railway inauguration)

  • भव्य तारांगण व विज्ञान उद्यान: धानोरा रस्त्यावरील "पंढरी" येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचे भव्य तारांगण व विज्ञान उद्यान उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असून, येथे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राचे शिक्षण मिळणार आहे.(Beed Pune railway inauguration)

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आणि पारितोषिक वितरण

या भव्य सोहळ्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार विजयसिंह पंडित हे लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रशासकीय पातळीवर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि विभागीय रेल्वे प्रबंधक राजेशकुमार वर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.(Beed Pune railway inauguration)

यावेळी भारतीय रेल्वेचे महाराष्ट्र राज्याच्या विकासातील योगदान या विषयावर आयोजित निबंध आणि चित्रकला स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. समारोप करताना त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र आदरांजली वाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.(Beed Pune railway inauguration)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >