Eknath Shinde speech : वडनगरहून उठलेल्या ठिणगीने संपूर्ण भारतात क्रांती घडवली; प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या २५ वर्षांच्या सेवायात्रेचा गौरव – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे









२५ वर्षांचा अविरत सेवाकाळ आणि कर्तृत्वाची उंची


प्रधानमंत्री मोदींच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासात पदे आणि जबाबदाऱ्या बदलल्या, परंतु त्यांचा ‘सेवेचा संकल्प’ कधीही बदलला नाही, असे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, मोदींच्या बाबतीत वयाचे आकडे नव्हे तर कर्तृत्वाची उंची मोजली जाते. ती हिमालयाच्या उंचीने आणि जनतेप्रती असलेल्या कार्याची खोली अरबी समुद्राने मोजावी. गॅस, पक्की घरे, बँक खाती आणि नळाचे पाणी यांसारख्या योजनांमुळे विकास थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला गेला आहे.(Narendra Modi 25 years of service)



विकसित भारताचा संकल्प आणि राष्ट्रीय प्रगती


यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी देशाच्या वाढत्या जागतिक प्रतिमेचा लेखाजोखा मांडला:





  • आर्थिक भरभराट: भारत जगातील १० व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प आहे.




  • सुरक्षित आणि सक्षम भारत: कलम ३७० चे उच्चाटन, देशाची मजबूत सुरक्षा आणि लष्कराच्या सामर्थ्यामुळे एका नव्या भारताची निर्मिती झाली आहे.




  • जागतिक प्रतिष्ठा: BRICS, ग्लोबल साऊथ, डिजिटल तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यात भारताची भूमिका निर्णायक ठरली असून विविध देशांनी मोदींना सन्मानित करणे हा १४० कोटी भारतीयांचा गौरव आहे.




2047 च्या विकसित भारताची नवी दिशा


महात्मा गांधी व सरदार पटेल यांच्या गुजरातमधून स्वातंत्र्याचे आंदोलन उभे राहिले होते, त्याच भूमीतून प्रधानमंत्री मोदींनी विकसित भारताचे ध्येय जनआंदोलन बनवले आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत, तंत्रज्ञानसक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या या प्रवासात वडनगरची ही ठिणगी आता संपूर्ण भारताची क्रांती बनली आहे, जी २०४७ च्या विकसित भारताचा बुलंद आवाज ठरेल, असा दृढ विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.(Narendra Modi 25 years of service)


या सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते





Comments
Add Comment

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षांच्या 'बिजली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू!

मुंबई : बोरीवली येथील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (Sanjay Gandhi National Park) एक दुःखद बातमी समोर आली आहे. २०१६

Karjat- Panvel Railway Route: २९.६ किमी लांबीच्या कर्जत- पनवेल मार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण, केव्हापासून मार्ग रेल्वे धावणार?

नवी मुंबई: कर्जत- पनवेलकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. कर्जतकरांना नवी मुंबईसाठी जाण्यासाठी मारावा

Ashok Kharat Bail : भोंदू अशोक खरातच्या जामिनावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 'या' दिवशी होणार

Ashok Kharat Bail : दैवी शक्तीचा दावा करत महिला भाविकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा

Djokovic comeback : नोव्हाक जोकोविच ११ वर्षांनंतर चायना ओपनमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज; बीजिंगमध्ये खेळणार स्पर्धा

बीजिंग : टेनिस जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्बियन दिग्गज टेनिसपटू आणि २४ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक

Nashik Traffic Update : गणेशोत्सवात नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर नो व्हेईकल झोन, पर्यायी रस्तेही जाहीर

Nashik Traffic Update : गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता नाशिक शहर

Latur Crime : फॉर्च्युनरमधून उतरले, थेट कोयता काढला अन् सपासप वार; हॉटेलसमोरच तरुणाची निर्घृण हत्या

लातूर : लातूर शहरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महात्मा बसवेश्वर