Dhule Accident News : शिरपूर - चोपडा रस्त्यावर भीषण अपघात, चार मजुर ठार

Dhule Accident News : शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर गावाच्या शिवारात भीषण अपघात घडला आहे. भरधाव मालमोटारीने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झालाय. हे चारही जण मध्य प्रदेशातील असून लुमरीया लालसिंग भिलाला (२५) व इसराम कालू भिलाला (४८, दोन्ही रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी), सुरेश रमेश कनासे (२६) आणि महेश लालसिंग कनासे (३१, रा. बालिया, ता. सनावद, जि. खरगोन, मध्य प्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अपघातानंतर मालमोटार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.



नेमकं काय घडलं ?


पन्नालाल कालूराम सिसोदिया यांनी थाळनेर ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार इसराम भिलाला हे या तिघांना सोबत घेऊन मोटारसायकल (क्र. एमपी-१०-झेडएन-३२२६) वरून शिरपूरकडून चोपड्याकडे जात होते. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावेर गावाच्या शिवारात (ता.शिरपूर) चोपड्याकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मालमोटारीने (क्र. एचआर-५५-एटी- १३५५) मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरील चौघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मालमोटार चालक घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, जखमींना तातडीने शिरपूर आणि धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला.


मृत सर्वजण मध्य प्रदेशातील असल्याने त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या भीषण अपघातामुळे शिरपूर-चोपडा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Sangli Accident News : शाळेतून घरी येताना कुटुंबावर काळ ओढावला; चिमुरडीसह वडिलांचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Sangli Accident News : सांगलीतील तासगाव मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Marathwada Special : मराठवाडा विशेष ! 17 सप्टेंबरचा स्वातंत्र्यसंग्राम ते आजचा मराठवाडा; जाणून घ्या या भूमीची संपूर्ण कहाणी

Marathwada Special : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला... पण भारताचा एक भाग असा होता, ज्याला स्वातंत्र्यासाठी आणखी १३ महिने

Weather Update : राज्यात पावसाची पूर्ण उघडीप! 17 सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यांना मिळणार दिलासा? जाणून घ्या हवामान खात्याने काय दिला इशारा...

Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Maharashtra Government : रेशन कार्डापासून परवान्यांपर्यंत सेवा होणार जलद; अन्न व नागरी पुरवठा विभागात GPR अंतर्गत मोठ्या सुधारणा

मुंबई : नागरिकांना शासकीय सेवा अधिक पारदर्शक, सुलभ, कालबद्ध आणि डिजिटल पद्धतीने मिळाव्यात, यासाठी अन्न, नागरी

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्रलंबित विकासकामे वेळ न दवडता पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच