Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या ‘बोगद्यातील मत्स्यालय’चे (टनेल एॅक्वेरियम)बांधकाम येत्या जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.जानेवारी २०२७ पर्यंत याचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या प्रांरभीच या टनेल ऍक्वेरियमचे लोकार्पण पूर्ण करून छोट्या बालकांसह सर्वांनाच विविध प्रकारच्या मत्स प्रकाराचे दर्शन घडू शकणार आहे.

भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुरुवारी १७ सप्टेंबर २०२६ रोजी भेट देऊन येथील विविध प्रकल्प आणि उपक्रमांची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात जास्वंद प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात जास्वंद वनस्पतीच्या फुलांच्या विविध रंगांच्या सुमारे ५० प्रजाती उपलब्ध आहेत.यावेळी आश्विनी भिडे यांनी यावेळी उद्यानातील जास्वंद प्रदर्शनाचेही अवलोकन केले. हे प्रदर्शन जनतेसाठी खुले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी आणि जास्वंदाच्या विविध रंगांच्या फुलांच्या प्रजाती पाहाव्यात, असे आवाहन आश्विनी भिडे यांनी यावेळी केले.


पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयुक्तांनी लावले सेंच्युरी पाम वृक्ष


केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियान अंतर्गत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यानात ‘सेंच्युरी पाम’ या वृक्षाची लागवड केली.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या ‘बोगद्यातील मत्स्यालय’च्या बांधकामाची त्यांनी पाहणी करत जानेवारी २०२७ पर्यंत सादर बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नवीन वर्षांच्या प्रारंभीच पर्यटकांना घुमटाकार तसेच पदभ्रमण मत्सालयात विविध प्रकारचे मासे न्याहाळता येणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेग्विन कक्षाजवळ आंतराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जात असून यासाठी विविध करांसह तब्बल ७०कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. मत्स्यालयाच्या बांधकामामध्ये घुमटाकार मत्स्यालय, पद भ्रमण बोगदा मत्स्यालय, पॉप-अप विंडो आदींची सुविधा असेल. आयताकृती आणि वर्तुळाकार टाक्या बोगद्या मत्स्यालयाव्यतिरिक्त, या मत्स्यालयात अॅक्रिलिक पॅनल्समध्ये बनवलेले ०४ आयताकृती टाक्या, ५ वर्तुळाकार टाक्या आणि ०२ अर्धगोलाकार टाक्या बनवण्यात येणार आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारचे मत्स्यजीव प्रदर्शित केले जाणार आहेत. जलचरांसाठी मत्स्यालयाअंतर्गत नैसर्गिक यातावरणा तयार करण्यासाठी कृत्रिम रॉक वर्कची व्यवस्था करण्यात येणार आहे,असे या मत्स्यालयाचे स्वरुप आहे.



घुमटाकार मत्स्यालय कसे असेल

बनवण्यात येणाऱ्या मत्स्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांचे आगमन होताच त्यांचे स्वागत छतामधील घुमटाकार मत्स्यालयाद्वारे होईल, ज्यामुळे पर्यटकांना जलचर जीवनाबद्दल कुतुहुल व आवड निर्माण होईल.

पद् भ्रमण बोगदा मत्स्यालय

या मत्स्यालयामध्ये ॲक्रेलिक पॅनल्समध्ये बनवलेले दोन थीम-आधारित बोगदा मत्स्यालय समाविष्ट आहेत. एक १४ मीटर लांबीचे कोरल फिश बोगदा मत्स्यालय असेल आणि ३६ मीटर लांबीचे खोल महासागर बोगदा मत्स्यालय असेल, जे पर्यटकांना पद् भ्रमणादरम्यान जलचर जीवनाचा अनुभव घेण्यास मदत करतील.

पॉप-अप विंडो अंतर्गत ३६० अंशांत पाहून शकतात जलचर

या मत्स्यालयात एका वेळी ०३ व्यक्ती सामावून घेणारी पॉप-अप विंडो सुविधा असेल. ज्यामध्ये मत्स्यालयाचे ३६० अंश दृश्य अगदी जवळून पाहू शकतात. ज्यामुळे विशेषतः मुलांना अनोखा अनुभव मिळू शकणार आहे.
Comments
Add Comment

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम

Mumbai News: भायखळा ते जे.जे मार्ग मे २०२८ पर्यंत होणार सुकर, निर्धारीत वेळेपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरातील दळणवळणाची व्‍यवस्‍था अखंड आणि एकीकृत करण्‍याच्‍या उद्देशाने मुंबई

Tree Authority : वृक्ष प्राधिकरणावर सदस्य व्हायचे आहे, वृक्षप्रेमी तसेच पर्यावरण,वृक्ष शास्त्रज्ञांना आहे संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ऑक्टोबर २०२६पर्यंत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी

Mumbai Ganeshotsav : गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा आता छोट्या रूपात; गिरगाव चौपाटीचा देखावा चर्चेत

मुंबई : मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी जमणारा लाखोंचा

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"] प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र