Mumbai News: भायखळा ते जे.जे मार्ग मे २०२८ पर्यंत होणार सुकर, निर्धारीत वेळेपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरातील दळणवळणाची व्‍यवस्‍था अखंड आणि एकीकृत करण्‍याच्‍या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी उड्डाणपूल प्रस्‍तावित केले आहे. या अंतर्गत भायखळा येथील सीताराम सिलम उड्डाणपूल (वाय ब्रिज) ते कुतुब - ए - कोंकण मखदूम अली माहिमी उड्डाणपूल (जे.जे. उड्डाणपूल) यांना जोडणा-या जे.जे. मार्ग आणि साबू सिद्दीकी तंत्रनिकेतन महाविद्यालय जंक्‍शन येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मुख्य केबल - स्टे पूल व वायाडक्ट तसेच पूर्व आणि पश्चिम बाजूस जोडणाऱ्या फ्लायओव्हर आर्म्सचा समावेश आहे.या पुलाचे काम २२ टक्के पूर्ण झाले असून मे २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.



अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्‍पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, सविस्‍तर आढावा घेत विविध निर्देश दिले. सर्वसमावेशक वाहतूक गतिशीलता आराखड्यानुसार या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्‍यात आले आहे. उड्डाणपुलाच्या मुख्य केबल - स्टे व वायाडक्ट भागाची एकूण रचना २ अधिक २ लेन स्वरूपाची आहे. केबल - स्टे भागाची लांबी सुमारे २३० मीटर, तर वायाडक्टची लांबी ३१२ मीटर आहे. या भागाची रुंदी १६.५ मीटर असून, डाव्या बाजूचा अप रॅम्प २०५ मीटर बाय ५.२५ मीटर, तर उजव्या बाजूचा अप रॅम्प २१३ मीटर बाय ५.२५ मीटर आहे. या संरचनेच्या बांधकामामध्ये आरसीसी तसेच स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची संरचनात्मक मजबुती, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन वापराच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक मानके साध्य करण्यास मदत होणार आहे.

मुख्य उड्डाणपुलाला जोडण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशेला फ्लायओव्हर आर्म्स विकसित करण्यात येत आहेत. हे आर्म्स १ अधि १ लेन स्वरूपाचे असतील. पश्चिम बाजूच्या फ्लायओव्हर आर्मची लांबी सुमारे २९० मीटर, तर पूर्व बाजूच्या फ्लायओव्हर आर्मची लांबी सुमारे ३५० मीटर आहे. दोन्ही बाजूंच्या फ्लायओव्हर आर्मची रुंदी ८.५ मीटर असून, त्यांच्या बांधकामासाठीही आरसीसी आणि स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या संरचनात्मक पद्धतींचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य केबल - स्टे पूल, वायाडक्ट आणि दोन्ही बाजूंचे फ्लायओव्हर आर्म्स यांची एकत्रित रचना केल्यामुळे विविध दिशांनी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.



या पूल प्रकल्‍पाचा निर्धारित कालावधी पावसाळा वगळून २६ महिने म्‍हणजेच मे २०२८ अशी आहे. सद्यस्थितीत अंमलबजावणीच्या टप्प्यात असलेल्‍या पूल प्रकल्‍पाची भौतिक प्रगती २२ टक्के आहे. तथापि, निर्धारित कालावधीपूर्वी प्रकल्‍प पुर्ततेसाठी कामाचे प्रभावी नियोजन करावे. आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची उपलब्धता तसेच विविध विभागांमध्ये योग्य समन्वय साधावा. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले.

प्रस्‍तावित उड्डाणपुलामुळे सर जमशेटजी जीजीभाई मार्गासह भायखळा - नागपाडा - माझगाव या दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक पट्ट्यातील जंक्शनवरील कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच, प्रवासाचा वेळ कमी होण्यास, पूर्व - पश्चिम व उत्तर - दक्षिण दिशेने होणाऱ्या वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्‍यासह संबंधित अभियंता, अधिकारी उपस्थित होते.
Comments
Add Comment

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात

Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम

Tree Authority : वृक्ष प्राधिकरणावर सदस्य व्हायचे आहे, वृक्षप्रेमी तसेच पर्यावरण,वृक्ष शास्त्रज्ञांना आहे संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ऑक्टोबर २०२६पर्यंत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी

Mumbai Ganeshotsav : गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा आता छोट्या रूपात; गिरगाव चौपाटीचा देखावा चर्चेत

मुंबई : मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी जमणारा लाखोंचा

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"] प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र