Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. येत्या १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या पुलाच्‍या सर्व बाजूची सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी या उड्डाणूपल प्रकल्‍पाची पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून हे पूल वाहतुकीसाठी मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे. प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्‍यासह संबंधित अभियंता, अधिकारी उपस्थित होते.(Sion station update)


मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी२ ) अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी व ६ वी) टाकणे नियोजित आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध व्‍हावी म्‍हणून शीव स्थानकाजवळील रेल्वेवरील पुलाची पुनर्बांधणी करण्‍याचे काम रेल्वे प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले आहे. तसेच, हा पूल ११२ वर्षे जुना व असुरक्षित ठरविण्यात आल्‍याने या पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले होते.(Sion station update)



रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. या पूल प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे विभागाच्या निधीमधून करण्यात येत आहे. निविदेनुसार या पुलाच्‍या पुनर्बांधणीचा कालावधी हा फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. मात्र, तत्‍पुर्वीच हा पूल सुरू करण्‍याचे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.(Sion station update)


रेल्वे रुळांवरून जाणा-या ५०० टन वजनी पहिल्या पोलादी तुळईच्‍या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २१ ऑगस्‍ट २०२६ रोजी आणि दुसऱ्या पोलादी तुळईच्‍या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २९ ऑगस्‍ट २०२६ रोजी मध्य रेल्वेमार्फत करण्यात आले आहे. तसेच दोन्ही तुळ्यांचे अपघात प्रतिबंधक सुरक्षा कठड्याचे काम प्रगतिपथावर आहे. डेक स्लॅबच्या काँक्रिट वेअरिंग कोटचे कामदेखील प्रगतिपथावर आहे.


सद्यस्थितीत पुलाच्या पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहीदास मार्ग (धारावी) पर्यंतच्‍या पोहोच रस्त्याचे पुनर्बांधकाम हे मुंबई महानगरपालिकेमार्फत अंतिम टप्‍प्‍यात आहे. पुलाच्या पूर्वेकडील जागा अंशतः मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई महानगरपालिकेस २५ ऑगस्‍ट २०२६ पासून पोहोच रस्त्याच्या कामाकरिता हस्तांतरित करण्यात आली आहे. त्‍यानुसार, पूर्वेकडील पोहोच रस्त्याचे काम मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. इतर सिमेंट काँक्रीटचे काम वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वे सोबत समन्वय साधून या पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे.



हा नवीन उड्डाणपूल ५४.५ मीटरचा एकच लांब स्पॅन आणि २९ मीटर रुंदीचा आहे. या आराखड्यानुसार, पुलाखाली खांब नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्‍यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात हा पूल सुरू झाल्यानंतर सायन, धारावी, कुर्ला आणि लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.(Sion station update)

Comments
Add Comment

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात

Mumbai News: भायखळा ते जे.जे मार्ग मे २०२८ पर्यंत होणार सुकर, निर्धारीत वेळेपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरातील दळणवळणाची व्‍यवस्‍था अखंड आणि एकीकृत करण्‍याच्‍या उद्देशाने मुंबई

Tree Authority : वृक्ष प्राधिकरणावर सदस्य व्हायचे आहे, वृक्षप्रेमी तसेच पर्यावरण,वृक्ष शास्त्रज्ञांना आहे संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ऑक्टोबर २०२६पर्यंत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी

Mumbai Ganeshotsav : गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा आता छोट्या रूपात; गिरगाव चौपाटीचा देखावा चर्चेत

मुंबई : मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी जमणारा लाखोंचा

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"] प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र