[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"]
प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचे सध्या इन्स्टाग्रामवर काही मराठमोळ्या अंदाजतले फोटो कमालीचे चर्चेत आले आहेत.[/caption]
[caption id="attachment_1059715" align="aligncenter" width="650"]
उर्फीने गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक मराठमोळा साज करत खास फोटोशूट केले आहे. तिच्या ह्या हटक्या फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले असून चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं जात आहे.[/caption]
[caption id="attachment_1059713" align="aligncenter" width="650"]
डार्क जांभळ्या रंगाची नऊवारी आणि लाल रंगाचा ब्लाऊज नेसून उर्फीने खूप सुंदर फोटोशूट केलं आहे. साडीच्या बॉर्डरवरील डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीच्या लूकचे सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे.[/caption]
[caption id="attachment_1059714" align="aligncenter" width="650"]
उर्फीने पारंपारिक लूकवर मराठमोळे दागिने परिधान करत सुंदर फोटोशूट केले आहे. उर्फीच्या निस्सिम सौंदर्यावर नेटकरी भाळले असून तिच्या फॅशनचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.[/caption]
[caption id="attachment_1059716" align="aligncenter" width="650"]
विचित्र कपडे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीला पारंपारिक लूकमध्ये पाहून फॅन्स थक्क झाले आहेत. 'पारंपारिक लूकमध्ये छान दिसतेस', असं म्हणत अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोंचे कौतुक केले.[/caption]
[caption id="attachment_1059717" align="aligncenter" width="650"]
उर्फीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.[/caption]