Lalbuagcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणी दानाचा वर्षाव; अवघ्या दोन दिवसांत १.३७ कोटींहून अधिक रोख रक्कम जमा

मुंबई : प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून भाविकांचा जनसागर उसळला आहे. बाप्पाच्या चरणी लीन होणाऱ्या भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले जात असून, गणेशोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसांत तब्बल १.३७ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी उधळण करत एकट्या एका दिवसात ८८.९० लाख रुपयांचे दान दिले आहे.



पहिल्याच दिवशी ४८.५० लाखांचे रोख दान आणि सोन्या-चांदीचे दागिने


">गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिले. दानपेटीच्या तपशिलानुसार, पहिल्या दिवशी 'स्टेज'वरील दानपेटीत २७.५० लाख रुपये, तर 'रांगेतील' दानपेटीत २१ लाख रुपये जमा झाले. या दोन्ही दानपेट्या मिळून पहिल्या दिवशी एकूण ४८.५० लाख रुपयांची रोख रक्कम गोळा झाली. रोख रक्कमेसोबतच भक्तांनी ६६.७७० ग्रॅम सोने आणि २,८०६ ग्रॅम चांदीचे मौल्यवान दागिने बाप्पाला अर्पण केले.



दुसऱ्या दिवशी दानाचा आकडा वाढला; सोन्या-चांदीच्या दानातही मोठी वाढ


उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी भाविकांच्या उत्साहात अधिकच भर पडली. या दिवशी 'स्टेज'वरील दानपेटीत ५९.६० लाख रुपये तर 'रांगेतील' दानपेटीत २९.३० लाख रुपये जमा झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा एकूण रोख दानाचा आकडा ८८.९० लाख रुपयांवर पोहोचला. यासोबतच दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे अर्पण वाढले असून, भाविकांनी २२६.१२० ग्रॅम सोने आणि ५,५१६ ग्रॅम चांदी राजाच्या चरणी अर्पण केली.



येत्या दिवसांत दानाचा आकडा आणखी वाढणार


पहिल्या दोन दिवसांचे सोन्या-चांदीचे दागिने वगळता, केवळ रोख रक्कमेचा विचार केला तर हा आकडा १ कोटी ३७ लाख रुपयांवर गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी २४ तास भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत या दानामध्ये आणि सोन्या-चांदीच्या अर्पणात अजून मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags
Lalbaugcha RajaMarathi newsLalbaugcha Raja Darshanmumbai ganeshotsavLalbaugcha Raja LiveLalbaugcha Raja NewsLalbaugcha Raja viral videoBappa MoryaGanesh Utsav MumbaiLalbaugcha Raja donationLalbaugcha Raja cash collectionLalbaugcha Raja 1.37 crore donationLalbaugcha Raja danpetiLalbaugcha Raja updates
Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस

न्यायालयीन लढ्याला राजकीय ठरवण्याचा डाव असल्याचा सतीश सालियन यांचा आरोप; सात दिवसांत माफीची मागणी मुंबई :

Ganpati Visarjan 2026 : श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांचा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी), दादर चौपाटी विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

BMC License Department : फेरीवाल्यांवर कारवाई होणार कशी?

महापालिकेच्या परवाना विभागात वाहन निरीक्षकांची १२ तर कामगारांची १६६ पदे रिक्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई

Mumbai Airport News : विमानतळाशेजारील तारांकित हॉटेल्सना वाहनतळात सवलत नाहीच!

प्रशासनाचा प्रस्ताव सुधार समितीने दुसऱ्यांदा फेटाळला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील आंतरराष्ट्रीय

POP Ganesh Idol Recycling : यंदा विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर मुलुंडमध्ये होणार पुनर्प्रक्रिया

येत्या २५ सप्टेंबर होणार संस्थेची निवड, विविध संस्थांकडून मागवले स्वारस्य अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत

Mumbai Crime : लालबागच्या गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत दागिने, मोबाईल आणि रोकड लंपास

मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात गणेशोत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत असताना चोरीच्या घटनांमध्ये वाढ