Manoj Jarange Patil : अखेर मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे! उदय सामंतांची पुन्हा एकदा यशस्वी शिष्टाई

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला. तसेच सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, उपोषण स्थगित केले असले तरी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन संपलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange Patil)



शिष्टाई चर्चानंतर आंदोलनाची दिशा बदलली


मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला होता. 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची दिशा बदलली आहे. आता तूर्तास मुंबईकडे जाण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.



सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. या चर्चेनंतर काही मागण्यांबाबत सरकारकडून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित गॅझेट आणि कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ( maratha reservation)



कारवाई झाली नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन होणार


जरांगे पाटील यांनी सरकारला पुढील 3 महिन्यांत मागण्यांवर निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. या काळात अपेक्षित कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा मुंबईकडे जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित झाले असले तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा कायम असून पुढील काळात सरकारकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 
Comments
Add Comment

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव

PM Narendra Modi birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर

Prime Minister Narendra Modi : 'ब्रिक्स'चा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर; भारताची जागतिक पत सिद्ध झाल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेचा यशस्वी समारोप झाला असून सर्वांच्या सहमतीने 'नवी

Malegaon Robbery : मध्यरात्री घरात घुसले सशस्त्र दरोडेखोर, वृद्धेसह तिघांना मारहाण, लाखोंचा ऐवज लंपास

Malegaon Robbery : मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक–आनंदवाडी शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडलीय.

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेसचं रहस्य काय ? डाएटबाबत पंतप्रधानांनीच सांगितल्या खास गोष्टी

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76वा वाढदिवस आहे. वय वाढत असताना फिटनेस आणि ऊर्जा टिकवून ठेवणं

Lalbuagcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणी दानाचा वर्षाव; अवघ्या दोन दिवसांत १.३७ कोटींहून अधिक रोख रक्कम जमा

मुंबई : प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून भाविकांचा जनसागर उसळला आहे.