Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी करा, उच्च न्यायालयात जनहित याचिका; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते आणि भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, तक्रारी करूनही पार्थ पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजकीय प्रभावामुळे पोलिसांकडून त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले नसल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.(Mundhwa Land Scam)



मुंढवा पोलीस ठाणे तसेच पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. अमेडिया एंटरप्रायझेसमधील पार्थ पवार यांच्या कथित भागीदारीचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. कंपनीमध्ये एक टक्के भागीदारी असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मग पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले नाही, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे.(Mundhwa Land Scam Parth Pawar)


या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानेही पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले नाही, याबाबत पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितल्याचा याचिकेत उल्लेख आहे. दोन आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आता दाखल झालेल्या नव्या याचिकेमुळे या प्रकरणातील तपास आणि पोलिसांच्या भूमिकेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.


मुंढवा येथील जमीन व्यवहाराबाबत याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुमारे १ हजार ८०० कोटी रुपये बाजारमूल्य असल्याचा दावा केलेली जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करून अवघे ५०० रुपये शुल्क भरल्याचा दावाही करण्यात आला आहे. उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.(Mundhwa Land Scam Parth Pawar)



२०२५ मध्ये पार्थ पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींची भागीदारी असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेसला ही जमीन विकण्यात आल्याचा आरोप याचिकेत आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार शीतल तेजवानी यांची पुणे पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली आहे. मात्र पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले नाही, याबाबत पोलीस महासंचालकांकडून उत्तर मागवावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.(Mundhwa Land Scam Parth Pawar)

Comments
Add Comment

Ahilyanagar News: नगरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, यंदा सरकारी कॉलेज सुरू होणार

अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे नगरकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले

Yudh Abhyas 2026: डोंगरात युद्धाचा सराव! भारत-अमेरिकेचे जवान, ड्रोन आणि रोबोटिक डॉग मैदानात

औली (उत्तराखंड) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास २०२६’ सध्या चर्चेत आला आहे.

County Championship : मानव सुथारच्या घातक फिरकीच्या बळावर वॉर्विकशायरची एसेक्सवर आठ गडी राखून शानदार मात

लंडन : भारतीय संघाकडून शानदार कसोटी पदार्पण करणारा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने काउंटी

PM Modi birthday wishes : क्रीडा जगताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७६ व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

नवी दिल्ली :

Nandurbar News : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्राणी येथील अनुदानित

Maharashtrachi Hasyajtra News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचं अपघाती निधन, टीमवर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं जातं. या शोचे फक्त