Tree Authority : वृक्ष प्राधिकरणावर सदस्य व्हायचे आहे, वृक्षप्रेमी तसेच पर्यावरण,वृक्ष शास्त्रज्ञांना आहे संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ऑक्टोबर २०२६पर्यंत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (दि. २४ जानेवारी २०२५ पर्यंत सुधारित) मधील कलम ३(३) अन्वये ही नियुक्ती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत, म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, सादर करावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.


कृषी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, वृक्षशास्त्र (आर्बोरिकल्चर), वनशास्त्र किंवा तत्सम क्षेत्रातील पदविका, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच वृक्षारोपण, वृक्षांचे जतन व संवर्धन यामध्ये अनुभव असलेले अशासकीय संस्थांमधील तज्ज्ञ, राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत अशासकीय संस्थेतील सक्रिय सदस्य तसेच सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांनाही अर्ज करता येईल.(Tree Authority)



अर्जदारास वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व वृक्ष संरक्षण या क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अशासकीय संस्था, महानगरपालिका किंवा अन्य प्राधिकरणांमध्ये पर्यावरणीय क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अशा संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल. तसेच वरील दोन्ही प्रकारच्या पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवार हा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा. इच्छुक उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक अर्हता, सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांसाठी शासकीय आस्थापनेचे नाव व पत्ता, सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेला हुद्दा, सदस्यत्व असलेल्या अशासकीय संस्थेचे नाव आणि अनुभवाचा तपशील नमूद करावा. शैक्षणिक अर्हता, अनुभव तसेच आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अशासकीय संस्थेतील सदस्यत्वाचा पुरावा संबंधित संस्थेच्या लेटरहेडवर असणे आवश्यक आहे.


अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांचे कार्यालय, दुसरा मजला, पेंग्विन बिल्डिंग, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, संत सावता माळी मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई – ४०००२७ या पत्त्यावर सादर करावेत. या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती मा. उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक ४६ सन २०१५च्या अंतिम निर्णयासापेक्ष असेल. तसेच हे नामनिर्देशन तात्पुरत्या स्वरूपाचे असून दरवर्षी नूतनीकरण करण्यासापेक्ष असेल, असे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांनी कळविले आहे.(Tree Authority)

Comments
Add Comment

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात

Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम

Mumbai News: भायखळा ते जे.जे मार्ग मे २०२८ पर्यंत होणार सुकर, निर्धारीत वेळेपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरातील दळणवळणाची व्‍यवस्‍था अखंड आणि एकीकृत करण्‍याच्‍या उद्देशाने मुंबई

Mumbai Ganeshotsav : गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा आता छोट्या रूपात; गिरगाव चौपाटीचा देखावा चर्चेत

मुंबई : मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी जमणारा लाखोंचा

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

[caption id="attachment_1059712" align="aligncenter" width="728"] प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र