Thursday, September 17, 2026

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव
PM Narendra Modi birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि राष्ट्रसेवेचे कौतुक करत त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (PM Narendra Modi birthday)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुभेच्छा संदेश पाठवून पंतप्रधान मोदींच्या जागतिक प्रभावाचा आणि राजकीय दूरदृष्टीचा गौरव केला. भारत आणि रशियामधील संबंध मजबूत करण्यात मोदींचे योगदान मोठे असल्याचे सांगत त्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा पुनरुच्चार केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकडून शुभेच्छा 
राजकीय वर्तुळातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत वडनगर ते वाराणसी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून वाढदिवस साजरा केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करत पंतप्रधानांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' असे संबोधले. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश 'विकसित भारताच्या' दिशेने वेगाने पुढे जात असल्याचे सांगत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
क्रीडा आणि चित्रपट सृष्टीतूनही पंतप्रधानांना खास शुभेच्छा मिळाल्या. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देशाप्रती मोदींचे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. तर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारताला गौरवशाली भविष्याकडे नेणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. अभिनेता अक्षय कुमारने 'सेवा संकल्पा'च्या माध्यमातून गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून वाढदिवस साजरा करण्याच्या कल्पनेचे स्वागत करत पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. (Narendra Modi Birthda)

पंतप्रधान मोदींच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेचा केला गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांच्या २५ वर्षांच्या सेवेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी सुशासनात नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत आणि सर्वसमावेशक विकासाला अभूतपूर्व गती व नवी दिशा दिली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >