Monday, November 2, 2026

Mumbai Bengaluru Vande Bharat Express: CCTV, लॉक दरवाजे अन् स्वच्छ टॉयलेट! ट्रॅव्हल क्रिएटरने सांगितला अनुभव

Mumbai Bengaluru Vande Bharat Express: बेंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रादेशिक संपर्क व्यवस्था अधिक बळकट करेल, तसेच आर्थिक वाढीला चालना देईल आणि शाश्वत परिवहन प्रणालीच्या विकासात योगदान देईल. ट्रॅव्हल क्रिएटर दिव्या साहा यांनी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या एका वैशिष्ट्याबद्दल म्हणजेच सुरक्षेबद्दल सांगितले.

नवीन बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस केवळ तिच्या वेग आणि आधुनिक रुपामुळेच नाही तर इतरही कारणांमुळे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या अधिकृत शुभारंभापूर्वी काही सोशल मीडिया क्रिएटर्सना या ट्रेनचा अनुभव घेण्याची आणि आपली मते मांडण्याची संधी मिळाली. ट्रॅव्हल क्रिएटर दिव्या साहा यांनी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या एका वैशिष्ट्याबद्दल म्हणजेच सुरक्षेबद्दल सांगितले. तिने निदर्शनास आणून दिले की, ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, कुलूप लावता येणारे दरवाजे आणि पुरेसा प्रकाश असलेले कॉरिडॉर आहेत. यामुळे रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित वाटू शकतो.

दिव्याच्या म्हणण्यानुसार बंद दरवाज्यांमुळे रात्री तिकीट नसलेले प्रवासी ट्रेनमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तिने स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबद्दलही सांगितले, जी बहुसंख्य महिलांसाठी आणखी एक मोठी चिंतेची बाब असते. दिव्याने सांगितले की, सकाळपासून प्रवास करूनही रात्री ११:३० वाजता स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत होती. त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, 'आशा आहे की लोक हे असेच टिकवून ठेवतील. प्रत्येकाला विकासाची गरज आहे, पण त्यासोबत नागरी जाणीव असण्याची जबाबदारीही येते.' आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, 'ही केवळ महिलांसाठीच नव्हे, तर पुरुष आणि महिला दोघांसाठीही असलेली सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. एक पुरुष म्हणून ही वैशिष्ट्ये मला इतर पुरुष आणि महिलांपासूनही सुरक्षित ठेवतील, अशी माझी अपेक्षा आहे आणि मी त्याचे कौतुक करतो.'

दक्षिण पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू- मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल आणि बंगळुरूहून सोमवारी आणि मुंबईहून मंगळवारी ही सेवा बंद राहील. दोन्ही शहरांमधील प्रवासाला सुमारे १६ तास लागतील. बेंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रादेशिक संपर्क व्यवस्था अधिक बळकट करेल, तसेच आर्थिक वाढीला चालना देईल आणि शाश्वत परिवहन प्रणालीच्या विकासात योगदान देईल. बेंगळुरू आणि मुंबई शहरांना अधिक जवळ आणणारी 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन केवळ व्यापार आणि वाणिज्यिक घडामोडींनाच चालना देणार नाही, तर औद्योगिक विकास, व्यावसायिक प्रवास आणि नवीन आर्थिक संधींसाठीही मार्ग मोकळा करेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडणारी बेंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन केवळ प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक सोयीस्करच करणार नाही, तर व्यापार, पर्यटन आणि आर्थिक घडामोडींनाही चालना देईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >