Satara Crime News : कपड्यांवर मिरचीची पूड, चेहऱ्यावर जखमा अन् रस्त्याच्या कडेला तरुणीचा संशयास्पद मृतदेह; परिसरात खळबळ

Satara Crime News : भोर-शिरवळ मार्गावरील राजेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) हद्दीत एका तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाच्या तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झाडाझुडपांमध्ये पालथ्या अवस्थेत आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या कपड्यांवर तसेच अंगावर मिरचीची पूड आढळली असून, चेहऱ्यावरही जखमा आहेत. या घटनेमुळे हा अपघात आहे की घातपात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, खुनाच्या संशयातूनही तपास सुरू केला आहे.



झाडाझुडपांत आढळला मृतदेह


सोमवारी सायंकाळी भोर-शिरवळ मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास राजेवाडी परिसरातील निर्जन वळणावर झाडाझुडपांमध्ये मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना (Shirwal Police Station) दिली. माहिती मिळताच शिरवळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तरुणीच्या तोंडावर आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळून आल्या. (Satara Crime News)



कपड्यांवर मिरचीची पूड


तरुणीच्या अंगावर आणि कपड्यांवर मिरचीची पूड आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तिच्या चेहऱ्यावरील जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, हा प्रकार अपघाती मृत्यूचा नसून घातपाताचा असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्व शक्यता तपासल्या जात असून तपासाची दिशा खुनाच्या संशयातूनही पुढे नेली जात आहे. (Satara Crime News)



तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही


दरम्यान, मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता महिलांची आणि तरुणींची माहिती घेतली जात आहे. तिची ओळख पटवण्यासोबतच मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम समोर आणण्यासाठी शिरवळ पोलिसांकडून तपास सुरू आहे. तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला? तिला घटनास्थळी आणण्यात आले होते का? आणि कपड्यांवर मिरचीची पूड कशी आली? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणार आहेत.

Comments
Add Comment

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव

PM Narendra Modi birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर

Prime Minister Narendra Modi : 'ब्रिक्स'चा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर; भारताची जागतिक पत सिद्ध झाल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेचा यशस्वी समारोप झाला असून सर्वांच्या सहमतीने 'नवी

Malegaon Robbery : मध्यरात्री घरात घुसले सशस्त्र दरोडेखोर, वृद्धेसह तिघांना मारहाण, लाखोंचा ऐवज लंपास

Malegaon Robbery : मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक–आनंदवाडी शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडलीय.

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेसचं रहस्य काय ? डाएटबाबत पंतप्रधानांनीच सांगितल्या खास गोष्टी

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76वा वाढदिवस आहे. वय वाढत असताना फिटनेस आणि ऊर्जा टिकवून ठेवणं

Lalbuagcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणी दानाचा वर्षाव; अवघ्या दोन दिवसांत १.३७ कोटींहून अधिक रोख रक्कम जमा

मुंबई : प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या (Lalbuagcha Raja 2026) दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातून भाविकांचा जनसागर उसळला आहे.