Mumbai Crime : लालबागच्या गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत दागिने, मोबाईल आणि रोकड लंपास

मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात गणेशोत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत असताना चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड चोरीला गेल्याच्या तक्रारी काळाचौकी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथील 2 तरुणांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी लालबाग परिसरात वर्षा फोपाले (67) या दर्शनाच्या रांगेत उभ्या होत्या. गर्दीत साडी सावरत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे 70,000 रुपये किमतीचा 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यानंतर काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.



याच ठिकाणी धनंजय बलसरफ (49) यांच्या 90,000 रुपये किमतीच्या 13 ग्रॅम सोन्याच्या साखळीचीही चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.


दरम्यान, दुपारी एका सुरक्षा रक्षकाचा मोबाईल आणि रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. मायकल नाडर (28) हे दर्शनाच्या रांगेत असताना त्यांच्या खिशातून सुमारे 25,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि 2,300 रुपये रोख रक्कम चोरीला गेली. चोरी लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर भाविकांनी 2 संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले. आरिफ सक्सेनसिंग गुज्जर (24) आणि सोमनाथ समनसिंग राठोड (23) अशी आरोपींची नावे आहेत.


याशिवाय गणेश गल्लीतील मुंबईचा राजा येथे दर्शनासाठी आलेल्या आरती कावळे (60) यांच्या सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या 25 ग्रॅम सोन्याच्या साखळीचीही चोरी झाली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या दोघांचा इतर चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. भाविकांनी गर्दीत दागिने, मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Comments
Add Comment

कल्याणच्या चार महिन्यांच्या बाळावर दुर्मिळ शस्त्रक्रिया, मुंबईच्या वाडिया रूग्णालयातील डॉक्टरांनी दिले जीवनदान

मुंबई: कल्याणमधील अवघ्या चार महिन्यांच्या बाळावर मुंबईच्या परळमधील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात दुर्मिळ

Mumbai Food Poison: लग्नाच्या जेवणानंतर वऱ्हाड्यांना विषबाधा; भांडुपमधील गंभीर प्रकार समोर

मुंबई: मुंबईतील भांडुप परिसरात लग्नसमारंभातील जेवण केल्यानंतर तब्बल 70 ते 100 वऱ्हाडींची प्रकृती बिघडल्याची घटना

Palghar Leopard Attack : पालघरमध्ये बिबट्याचा भीषण हल्ला! 65 वर्षीय महिला शेतमजुराचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील

दिवाळीच्या काळात अन्नभेसळीविरोधात FDA ची मोठी कारवाई! 19.01 कोटींचा अन्नसाठा जप्त; अनेक व्यावसायिकांचे परवाने निलंबित

मुंबई : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध

दादरमध्ये महायुतीची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रा

[caption id="attachment_1071602" align="aligncenter" width="800"] दादर येथे आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ पदयात्रेचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री

दिवाळीत प्रदूषणमुक्तीचा सल्ला देणाऱ्यांच्या तोंडाला ईद, मोहरमवेळी कुलूप का? - मंत्री नितेश राणे यांचा सवाल

मुंबई : दिवाळीत फटाके न फोडण्याचे आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारा अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ