Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी म्हणाले...

सीबीआयच्या नव्या FIR नंतर प्रकरण पुन्हा चर्चेत


मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणात नव्याने FIR दाखल केली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे ही FIR नोंदवण्यात आली असून, त्यामध्ये अनेक व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख आहे. मात्र, FIR मध्ये नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्तीला आरोपी ठरवण्यात आले आहे, असे नाही. ( Disha Salian Case)



या प्रकरणात समोर आलेल्या व्यक्तींची नावे


मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंह आणि इतर काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. सीबीआय या प्रकरणातील आधीचे पोलीस रेकॉर्ड, वैद्यकीय आणि फॉरेन्सिक कागदपत्रे तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब तपासणार आहे. ( Aaditya Thackeray)




 

अमित ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया


दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे हे आपले भाऊ असल्याने आपण त्यांना चांगले ओळखतो आणि ते अशा प्रकारच्या घटनेत सहभागी होऊ शकत नाहीत, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा न्यायालयीन लढा सुरू असून सत्य तपासातून समोर येईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.



दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे म्हणाले....


आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी दिशा सालियन यांच्याशी आपली कोणतीही भेट किंवा ओळख नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. नव्याने होणारा तपास निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.



घटनेला ६ वर्ष झाली तरीसुध्दा?


दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत ( Sushant Singh Rajput) याचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांमुळे गेल्या काही वर्षांपासून विविध चर्चा आणि आरोप होत आहेत. आता सीबीआयच्या नव्या तपासामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Banganga Aarti : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिलच्या ऐतिहासिक बाणगंगा येथे महाआरती संपन्न; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई :

Mumbai News: नवीन वर्षात राणीबागेत घुमटाकार मत्स्यालयाचे होणार लोकार्पण, कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात नव्याने उभारण्यात

Sion station update : शीव येथील रेल्वेचा पूल नोव्हेंबरपासून सेवेत? येत्या १५ऑक्टोबरपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाची केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम

Mumbai News: भायखळा ते जे.जे मार्ग मे २०२८ पर्यंत होणार सुकर, निर्धारीत वेळेपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरातील दळणवळणाची व्‍यवस्‍था अखंड आणि एकीकृत करण्‍याच्‍या उद्देशाने मुंबई

Tree Authority : वृक्ष प्राधिकरणावर सदस्य व्हायचे आहे, वृक्षप्रेमी तसेच पर्यावरण,वृक्ष शास्त्रज्ञांना आहे संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ऑक्टोबर २०२६पर्यंत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी

Mumbai Ganeshotsav : गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा आता छोट्या रूपात; गिरगाव चौपाटीचा देखावा चर्चेत

मुंबई : मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी जमणारा लाखोंचा