Mumbai Accident : ब्रेकिंग ! ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; एक जण जखमी

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या कारचा पादचाऱ्याला धडक लागून अपघात झाल्याची घटना मुंबईतील विलेपार्ले परिसरात घडली आहे. या अपघातात सुनील धुलविया नावाचा पादचारी किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सुनील प्रभू हे कारमध्ये उपस्थित होते आणि त्यांचा चालक वाहन चालवत होता. मुंबई विमानतळाकडून कांदिवलीच्या दिशेने कार जात असताना पादचारी सुनील धुलविया यांना वाहनाचा धक्का लागला. या घटनेत ते किरकोळ जखमी झाले.


जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

अपघातानंतर सुनील प्रभू यांनी पोलिसांच्या 100 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.


पोलीस तपास सुरु 

पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली जात असून जखमी पादचाऱ्याचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाण्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला, वाहनाचा वेग किती होता आणि यामध्ये चालकाची काय भूमिका होती, याचा तपास पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे.


या घटनेबाबत अधिकृत पोलीस नोंद किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणातील पुढील तपशील स्पष्ट होणार आहेत.

Comments
Add Comment

BMC Guidelines : गणेशोत्सवासाठी बीएमसीची 'कडक' नियमावली! प्रसाद, अग्निसुरक्षा अन् स्वच्छतेबाबत नवे नियम जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026)  पार्श्वभूमीवर भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव

Ganeshotsav 2026 : लालबागच्या राजाच्या दरबारात अंबानी कुटुंब! मुकेश अंबानी, अनंत आणि राधिकाने घेतले दर्शन, आरतीतील व्हिडिओ व्हायरल!

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह (Ganeshotsav 2026) शिगेला पोहोचला असून शहरातील अनेक दिग्गज मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी

Olympia Coffee House : मुंबईतील प्रसिद्ध ऑलिम्पिया कॉफी हाऊसवर FDA ची कारवाई; अस्वच्छता आढळल्याने परवाना निलंबित

अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई; 14 खाद्य आस्थापनांवर निलंबनाची कारवाई मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर

National Pension Scheme : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना

स्थायी समितीने दिली पेन्शन योजनेला मंजुरीची दावे महापालिका मंजूर करणार, अधिदान एनएसडीएल काढणार मुंबई (विशेष

iPhone 18 Pro : iPhone 18 Pro ची भारतात विक्री सुरू! खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळूरमध्ये रात्रीपासूनच ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांचा रांगा

मुंबई : ॲपलच्या नव्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची विक्री सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी म्हणाले...

सीबीआयच्या नव्या FIR नंतर प्रकरण पुन्हा चर्चेत मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने