मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई यंदा मलेरियाच्या आजाराने डोकेवर काढले असून मागील वर्षीच्या ९ महिन्यातील आजारांच्या तुलनेत या वर्षीच्या ९ महिन्यांत मलेरियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षीच्या जाने ते १५ सप्टेंबर २०२५मधील ६,२७७ रुग्णांच्या तुलनेत यंदाच्या या कालावधीत ८,७२३ रुग्ण आढळले आहेत. तर जून ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५,९८४ एवढे मलेरियाचे रुग्ण होते. दुसरीकडे, डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि कोविड-१९ या आजारांच्या रुग्णसंख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येते.(Mumbai BMC health report)
मुंबई महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या पावसाळाजन्य आजारांच्या मासिक तुलना अहवालानुसार, यंदा जानेवारी ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मलेरियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या ६,२७७ रुग्णांच्या तुलनेत यंदा ८,७२३ रुग्ण आढळले आहेत. तर जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ४३०४ मलेरियाचे रुग्ण होते आणि आणि जून ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीमध्ये ५९८४ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग ...
महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेक्टर नियंत्रण कार्यवाहीअंतर्गत मलेरिया नियंत्रणासाठी २१,६६५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३,३६७ ठिकाणी अॅनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळली. डेंग्यू नियंत्रणासाठी ४ लाख ६८,९९३ उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात आली असून ११,७७६ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळली. यादरम्यान ६६९ जुने टायर आणि २२,३४४ भंगार वस्तू काढून टाकण्यात आल्या. तसेच २०,७२३ इमारत परिसरांत व ३,२९,७१६ झोपड्यांमध्ये धूरफवारणी करण्यात आली.(Mumbai BMC health report)
अहवालानुसार डेंग्यूचे रुग्ण गेल्या वर्षीच्या २,७२४ वरून यंदा २,६४६ पर्यंत घटले आहेत, तर चिकुनगुनियाचे रुग्ण ५४२ वरून थेट ८० पर्यंत खाली आले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे प्रमाणही ५५८ वरून ३९० पर्यंत कमी झाले आहे. मात्र एच१एन१च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली असून, ती ८३ वरून ५०७ पर्यंत पोहोचली आहे.(Mumbai BMC health report)
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व प्रभागांमध्ये विविध सार्वजनिक आरोग्य जनजागृती उपक्रम हाती घेतले आहेत. गणेश मंडळांना 'आयईसी' भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले असून, मलेरिया व डेंग्यू याबाबत जनजागृतीपर जिंगल्सही वाजवली जात आहेत. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पालिकेने ५ लाख ९४ हजार २६९ घरांचे सर्वेक्षण करून २७ लाख ९३ हजार १९३ नागरिकांची तपासणी केली. या काळात ३२,११४ रक्तनमुने घेण्यात आले, तर लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार ९,८४२ नागरिकांना देण्यात आले. आरोग्य विभागाने नागरिकांना घर व परिसरात पाणी साचू न देण्याचे, जुने टायर-टाक्या-भंगार वस्तू साठवून न ठेवण्याचे आणि दिवसा-रात्री मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.(Mumbai BMC health report)
महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अहवाल
| आजार | २०२५ | २०२६ |
| मलेरिया | ६,२७७ | ८,७२३ |
| डेंग्यू | २,७२४ | २,६४६ |
| चिकुनगुनिया | ५४२ | ८० |
| लेप्टो | ५५८ | ३९० |
| गॅस्ट्रो | ५,९८९ | ४,९९७ |
| एच१एन१ | ८३ | ५०७ |
| कोविड-१९ | १,११८ | १७८ |





