मुंबई : मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा शुक्रवारी (१८ सप्टेंबर) संध्याकाळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर करून ChatGPT वर प्रश्नपत्रिका अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. या घटनेनंतर संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.(IIT Bombay Student Death)
परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर
मृत विद्यार्थी ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. IIT बॉम्बेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, परीक्षेदरम्यान तो मोबाईल फोन वापरत असल्याचे आढळले. त्याने प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थेने सांगितले. या घटनेनंतर संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा केली. त्याचे समुपदेशन करण्यात आले आणि या प्रकारामुळे त्याच्या शैक्षणिक भवितव्यावर विपरीत परिणाम होणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (IIT Bombay Student Death)
प्रत्येक नोंदीची माहिती एक्वा सर्व्हरला मिळणार त्वरीत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या भरणा केंद्रांवर टँकरद्वारे ...
वसतिगृहात आढळला मृत
परीक्षेनंतर विद्यार्थी आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला. त्यानंतर संध्याकाळी तो खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही सुरू केली. मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि कारणांचा तपास संबंधित अधिकारी करत आहेत.(IIT Bombay Student Death)
विद्यार्थ्यांचे आंदोलन; परीक्षा स्थगित
विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर IIT बॉम्बेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ४०० हून अधिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांनी घटनेबाबत अधिक माहिती आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मिड-सेमिस्टर परीक्षाही स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. संस्थेने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून, त्याचे मित्र, सहाध्यायी आणि प्राध्यापकांना आवश्यक मदत देण्यात येत असल्याचे सांगितले आहे.(IIT Bombay Student Death)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, डॉ. आर एन कुपर रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय समूह, संत मुक्ताबाई ...
दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, शैक्षणिक ताण आणि परीक्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंबंधी नियम यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, परीक्षेतील प्रकार आणि विद्यार्थ्याच्या मृत्यूचा थेट संबंध असल्याचे अद्याप तपासातून निश्चित झालेले नाही.(IIT Bombay Student Death)





