Nashik Kumbh Mela CCTV : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये 5 हजार AI कॅमेऱ्यांचे जाळे, साधुग्राम, घाट आणि पार्किंगवर विशेष नजर

Nashik Kumbh Mela CCTV : 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यासाठी नियोजित कॅमेऱ्यांच्या संख्येत आणखी एक हजारांची वाढ करण्यात आली असून, आता नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात एकूण 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करण्याचे नियोजन आहे.



साधुग्राम, घाट आणि पार्किंगवर विशेष लक्ष


नाशिक शहरात यापूर्वी तीन हजार, तर त्र्यंबकेश्वरमध्ये एक हजार अशा एकूण चार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सूचनेनंतर प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन आराखड्यात साधुग्राम, नव्याने विकसित होणारे घाट आणि वाहनतळे यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी एक हजार कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यातील सुमारे 350 कॅमेरे तपोवनातील साधुग्राममध्ये, 250 कॅमेरे शहरातील विविध वाहनतळांवर, तर गोदावरी नदीकाठावरील नव्या घाटांवर सुमारे 400 कॅमेरे बसवले जाणार आहेत.



12 कोटी भाविकांच्या गर्दीचे आव्हान


प्रयागराजनंतर 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे 12 कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोदावरी नदीकाठावरील दाट लोकवस्तीच्या परिसरात कुंभमेळा होत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच ड्रोनद्वारे देखरेख आणि एकात्मिक सुरक्षा यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. AI तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांमुळे गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आणि संभाव्य परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.



मार्च 2027 पर्यंत कॅमेरे बसवण्याचे लक्ष्य


कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या माहितीनुसार, नवीन कॅमेरे बसवण्याचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यानंतर सीसीटीव्ही फुटेज, ड्रोनद्वारे निगराणी, माहितीचे विश्लेषण आणि मध्यवर्ती कमांड सेंटरशी जोडणी अशा विविध टप्प्यांतून ही सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण नेटवर्क सुरू करण्याचे नियोजन आहे.



कुंभमेळ्यानंतरही कॅमेऱ्यांचा उपयोग


साधुग्राम, वाहनतळे आणि घाटांवर बसवले जाणारे अतिरिक्त 1 हजार सीसीटीव्ही कॅमेरे कुंभमेळ्याच्या कालावधीसाठी तात्पुरते असतील. कुंभमेळा संपल्यानंतर पोलीस यंत्रणेशी चर्चा करून हे कॅमेरे शहरातील इतर आवश्यक ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्यानंतरही नाशिक शहरात 4 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्यापक जाळे कायमस्वरूपी उपलब्ध राहणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

Comments
Add Comment

Shetkari Karjmafi Yojana 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ! तिसरी कर्जमाफी यादी कधी जाहीर होणार ?

Shetkari Karjmafi Yojana 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी

Hanuman Ansh movie : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 'हनुमान अंश'च्या टीमचा सत्कार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून चित्रपटाच्या घवघवीत यशाचे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'हनुमान अंश' या चित्रपटाच्या टीमची मुंबईतील

Medical store CCTV : प्रत्येक मेडिकल स्टोअरवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर! सरकारचा नवा प्रस्ताव; पण औषध विक्रेत्यांचा विरोध का?

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा मोठा प्रस्ताव समोर

Jalgaon Crime News : बांभोरी पुलावरून विवाहितेची गिरणा नदीत उडी, विवाहितेचा 15 तासांनंतरही शोध नाही

Jalgaon Crime News : जळगाव शहरालगत असलेल्या बांभोरी पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेतलेल्या विवाहितेचा अद्याप ठावठिकाणा

Mumbai Municipal Corporation : चौदा फुटाच्या वर झोपड्यांचे बांधकाम, स्वतः तोडा नाहीतर महापालिकेचा हातोडा

१ ऑक्टोबर पासून महापालिकेची थेट कारवाई मुंबई (विशेष प्रतिनिधी) : येत्या १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत

Jalgaon Crime News : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह ! अभियंता तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, कारण अस्पष्ट

Jalgaon Crime News : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या २८ वर्षीय अभियंत्याने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची