Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मामा-भाच्याच्या नात्याला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरुनगरमध्ये भाच्याने मामाचा गळा चिरून निर्घृण खून केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.प्रविण कोहिनकर याने त्याचा मामा संदीप गडदे यांचा गळा चिरून खून केल्याचा प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यानंतर प्रविणनेही आत्महत्या केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण समोर
राजगुरुनगरमधील एका भाड्याच्या घरात ही घटना घडली. प्रविण कोहिनकर याने संदीप गडदे यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःचं जीवनही संपवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी प्रविणने सुसाईड नोट लिहिल्याची प्राथमिक माहिती आहे. या नोटमध्ये मामाकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. मात्र, हा त्रास नेमका कोणत्या कारणामुळे होता, मामा-भाच्यामध्ये यापूर्वी काही वाद किंवा कौटुंबिक तणाव होता का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मुंबई : आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याचा १८ सप्टेंबर २०२६ रोजी वसतिगृहात ...
पोलिसांकडून नातेवाईकांची चौकशी
या प्रकरणात पोलिसांकडून सुसाईड नोटसह घटनास्थळावरील इतर पुरावे तपासले जात आहेत. मामा-भाच्याच्या संबंधांबाबत माहिती मिळवण्यासाठी नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. प्रविणने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, सुसाईड नोटमध्ये काय नमूद आहे आणि या घटनेमागील नेमकं कारण काय, याचा तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.