Shetkari Karjmafi Yojana 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ! तिसरी कर्जमाफी यादी कधी जाहीर होणार ?

Shetkari Karjmafi Yojana 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तिसऱ्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिसरी लाभार्थी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.



तिसऱ्या यादीची प्रतीक्षा संपणार ?


कर्जमाफी योजनेअंतर्गत यापूर्वी दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आता तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची पडताळणी सुरू असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिसरी यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, या टप्प्यात राज्यातील जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना सुमारे 4 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.



मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर योजनेची अंमलबजावणी


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आली. त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या दोन याद्यांमधून सुमारे 6 लाख शेतकऱ्यांना 5 हजार कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. माहितीतील तफावत किंवा तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हास्तरावर विशेष यंत्रणाही कार्यरत आहे.



32 लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर


कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता योजनेच्या अंमलबजावणीसाठी 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँका, अशा एकूण 53 बँकांनी तब्बल 32 लाख कर्जखात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑगस्टअखेरपर्यंत 12 लाख 10 हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याची माहिती आहे.



सप्टेंबरअखेर तिसरी यादी ?


आता तिसऱ्या टप्प्यातील पडताळणी अंतिम टप्प्यात असल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम यादी आणि लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची अधिकृत तारीख संबंधित विभागाकडून जाहीर झाल्यानंतरच निश्चित होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Crime News : बांभोरी पुलावरून विवाहितेची गिरणा नदीत उडी, विवाहितेचा 15 तासांनंतरही शोध नाही

Jalgaon Crime News : जळगाव शहरालगत असलेल्या बांभोरी पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेतलेल्या विवाहितेचा अद्याप ठावठिकाणा

Jalgaon Crime News : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह ! अभियंता तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, कारण अस्पष्ट

Jalgaon Crime News : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या २८ वर्षीय अभियंत्याने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची

Ahilyanagar News : पतीच्या शिक्षिकेसोबतच्या संबंधाच्या संशयातून पत्नी थेट शाळेत, पुढे घडले असे काही की...

Ahilyanagar News : पती आणि प्राथमिक शिक्षिकेतील कथित जवळकीच्या संशयातून संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळेत जाऊन शिक्षिकेला

Jalgaon Cotton Rate : जळगावात कापसाला हंगामाच्या सुरुवातीलाच 8,500 रुपये भाव, दरवाढीची शक्यता

Jalgaon Cotton Rate : जळगाव जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामाला सुरुवात झाली असून, जिनिंग आणि बाजार समित्यांमध्ये

BMC Hospital News : शीव, कुपर, ट्रॉमा, क्षयरोगसह महापालिकेची पाच रुग्णालये कँटीनसह फायरप्रुफ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, डॉ. आर एन कुपर रुग्णालय,

Pune Accident : नवले पूल परिसरात पुन्हा भीषण थरार; ब्रेक फेल झालेल्या ३ ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुणे : पुण्यातील अत्यंत धोकादायक आणि अपघातांचे केंद्र ठरलेल्या नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा