मुंबई: गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर १, २ आणि ३ या वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) हाती घेतले आहे. म्हाडाकडून हाती घेण्यात आलेल्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये तब्बल १५ एकर हरित परिसराची निर्मिती केली जाणार आहे. म्हाडाकडून गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये क्लस्टर पुनर्विकासावर भर दिला जात आहे. त्याच आधारावर मोतीलाल नगरमध्येही क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. तिथल्या नागरिकांना प्रशस्त घर आणि परिसरातील सुशोभिकरण यामुळे त्यांचे राहणीमान आणखीन सुधारणार आहे.
मोतीलाल नगरमध्ये उभारल्या जाणाऱ्या हरित परिसराचा मॉडेल शक्य असेल त्या ठिकाणीही म्हाडाकडून उभारला जाणार आहे. मुंबईपासून काही मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या गोरेगावमध्ये मोठ्याप्रमाणावर नागरिकांची वस्ती आहे. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. गोरेगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी हरित परिसराची निर्मिती आरोग्य व पर्यावरणपूरक जीवनशैलीकरिता महत्वाची ठरणार आहे. १४३ एकर जमिनीवर गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर वसलेलं आहे. या परिसरामध्येच पुनर्विकास केला जाणार आहे.
Lalbagcha Raja News: जबरदस्त,'प्रसाद ते उर्जा'; ‘लालबागच्या राजा’च्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार
मुंबई: मुंबईमध्ये अनेक प्रसिद्ध मंडळांकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यासह ...
मोतीलाल नगरातील वसाहतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून सी अँण्ड डीए (बांधकाम व विकास संस्था) मॉडेलवर केला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच या प्रकल्पाचा मास्टर प्लान रहिवाशांना सादर करण्यात आला होता. गोरेगाव पश्चिमेतील न्यू लिंक रोड लगत मोतीलाल नगर १ आणि मोतीलाल नगर २, ३ असे दोन भूखंड आहेत. या वसाहतींतील मिळून सुमारे ३७०० म्हाडा सदनिकाधारक रहिवाशांचे पुनर्वसन या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात येणारा मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्लॅननुसार १५ एकर जमिनीवर करण्यात येणाऱ्या हरित परिसराची निर्मिती ही एकूण जमिनीपैकी १० टक्क्यांपेक्षा अधिकची आहे.
मोतीलाल नगरमध्ये सध्याच्या असणाऱ्या झाडांना हात न लावता त्यांचे संवर्धन करण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. अनेक लुप्त होणारे झाडं सुद्धा आपल्याला मोतीलाल नगरमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक झाडांच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी म्हाडा प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.