नागोया (जपान): आशियाई खेळ २०२६ मधील महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी सुरू ठेवित अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बांगलादेशचा तब्बल ११४ धावांनी पराभव केला. गतविजेता भारत आता आपले विजेतेपद टिकवण्यासाठी अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, नऊ दिवसांत विजेतेपदाच्या लढतीत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यातही भारताने श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव केला होता.
मुंबई : रायफल हातात घेतली, लक्ष्यावर नजर रोखली आणि अचूक निशाणा साधत भारतीय नेमबाज एलावेनिल वलारिवनने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. ...
शफाली वर्माचे धडाकेबाज शतक आणि स्मृती मंधानाचा विक्रम
नागोजामध्ये झालेल्या या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ४ गडी गमावून मजबूत १९५ धावा केल्या. युवा फलंदाज शफाली वर्मा भारताच्या या विजयाची खरी शिल्पकार ठरली. तिने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावांची आतषबाजी करत आपल्या व्हाईट-बॉल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले. तसेच, सलामीवीर स्मृती मंधानाने १९ चेंडूंमध्ये ३७ धावांची वेगवान खेळी केली. डावाच्या तिसऱ्या षटकात आठवी धाव पूर्ण करत मंधानाने महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'सर्वाधिक धावा करणारी खेळाडू' ठरण्याचा मोठा विक्रम नावावर केला. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंमध्ये ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.(India vs Bangladesh)
बांगलादेशचा डाव ८१ धावांत गारद
विजयासाठी मिळालेल्या १९६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे कोलमडला. बांगलादेशचा डाव आपली पूर्ण षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या १५.४ षटकांत ८१ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशतर्फे सलामीवीर दिलारा अख्तरने सर्वाधिक २८ धावा केल्या. भारतीय गोलंदाजीसमोर काही वेळ तग धरू शकणारी ती एकमेव फलंदाज ठरली. तिच्याशिवाय सुलताना खातून आणि शर्मिन अख्तर या दोघींनाच दुहेरी आकडा गाठता आला.(India vs Bangladesh)
मुंबई: 'बिग बॉस २०'चा शनिवारी रात्री 'विकेंड का वार' चा एपिसोड टेलिकास्ट झाला. हा एपिसोड सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. काल भर शोमध्ये भाईजानने ...
भारताची भेदक गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला.
-
दीप्ती शर्मा: २.४ षटकांत केवळ ७ धावा देत ३ बळी.
-
नंदिनी शर्मा: ४ षटकांत २५ धावा देत ३ बळी.
-
श्री चरणी: ७ धावा देत २ महत्त्वपूर्ण बळी.
या दणदणीत विजयामुळे भारतीय संघाने अंतिम फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले असून सुवर्णपदकावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.(India Women Cricket)





