Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जाण्यास वडिलांनी नकार दिल्याने सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घुमावल (ता. चोपडा) येथे घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश विसर्जनानिमित्त घुमावल गावात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत जाण्यासाठी मुलगा उत्सुक होता. मात्र काही कारणामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत जाण्यापासून वडिलांना मुलास नकार दिला. त्यानंतर मुलगा नाराज झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीला जाण्यास मनाई करण्यात आल्यानंतर तो रागाच्या भरात घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेला.काही वेळाने मुलगा दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी तो तिसऱ्या मजल्यावर आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
Nashik Crime News: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी सकाळी उभ्या असलेल्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ ...
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद
घटनेनंतर चोपडा ग्रामीण पोलिस (Chopda Rural Police Station) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कुटुंबीयांकडून घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली आहे. मुलाच्या मोबाईल वापराबाबत तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीला जाण्याच्या विषयावरून झालेल्या चर्चेबाबतही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. घटनेमागे नेमके कोणते कारण होते, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार वडिलांनी गणेश विसर्जन मिरवणुकीला जाण्यास मनाई केल्यामुळे मुलगा नाराज झाला होता. मात्र, यालाच घटनेचे अंतिम कारण मानता येणार नसून पोलीस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.